बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा बॉलिवूडचे पावर कपल आहे. अलिकडेच त्यांनी ते आई-बाबा होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती. अशात कियारा अडवाणी अनेक वेळा स्पॉट झाली आहे. आता मात्र कियारा अडवाणीने आपल्या स्टाइलनं चाहत्यांना वेड लावले आहे. न्यू यॉर्कमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'मेट गाला 2025' या (Met Gala 2025 ) फॅशन इव्हेंटमध्ये कियाराने आपल्या लूकने सर्वांचे मन जिंकले आहे.
ने 'मेट गाला 2025' इव्हेंटमध्ये एका खास लूकमध्ये बेबी बंप फ्लॉन्ट केला आहे. तिच्या या लूकचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कियाराने याचे फोटो इन्स्टाग्राम देखील शेअर केले आहे. या फोटोला तिने हटके कॅप्शन देखील दिले आहे. तिने लिहिलं आहे. की, "मे महिन्यातील पहिला सोमवार..." तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.
कियाराचा लूकअभिनेत्री कियारा अडवाणी ' 2025' फॅशन इव्हेंटसाठी ब्लॅक, व्हाइट आणि गोल्डन रंगाचा वेस्टन गाऊन परिधान केला आहे. मोकळे केस आणि गोल्डन ज्वेलरीने तिने हा लूक पूर्ण केला आहे. रेड कार्पेटवर तिच्या एन्ट्रीने चार चाँद लागले. कियाराच्या या ड्रेसला 'ब्रेव्हहार्ट्स' असे नाव देण्यात आले आहे. तिचा हा ड्रेस महिला शक्ती, मातृत्व आणि बदलाच्या एका नवीन टप्प्याचे प्रतीक होते. दोन प्रतीकात्मक रूपे - मदर हार्ट आणि बेबी हार्ट ड्रेसवर पाहायला मिळाले. जे एका साखळीच्या नाभीने जोडलेली आहेत. या हृदयस्पर्शी चिन्हाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
कियारा अडवाणीचा हा स्टायलिश डिझायनर ड्रेस फॅशन डिझायनर गौरव गुप्ता यांनी बनवला आहे. कियाराच्या या लूकमध्ये फॅशन आणि भावना दोन्हीचा उत्तम मेळ घातलेला पाहायला मिळत आहे. जेव्हा कियाराला या खास लूकबद्दल विचारण्यात आले तेव्हा ती भावुक होऊन म्हणाली की,"एक कलाकार आणि आई होणारी महिला म्हणून हा क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षणांपैकी एक आहे."