Met Gala 2025: मनोरंजन विश्वात 'मेट गाला' सोहळ्याची जोरदार चर्चा सुरुये. या सोहळ्यात अनेक सेलिब्रिटी मेट गाला रेड कार्पेटवर उपस्थित होते. सगळ्या कलाकरांचा हटके लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. परंतु यामध्ये खास आकर्षण ठरली ती प्रियांका चोप्रा. तिने एका खास डिनरमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतलंय.
मेट गाला 2025 मधील आपल्या पाचव्या आणि अत्यंत प्रतीक्षित उपस्थितीच्या आधी जागतिक आयकॉन जोनस हिने ऑलिव्हियर रूस्ताँ यांच्यावतीने आयोजित केलेल्या एका खास डिनरमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या सोहळ्यात केवळ त्यांच्या आगामी मेट गाला लूकसाठीच्या प्रभावी कोलॅबरेशनचा उत्सव साजरा करण्यात आला नाही, तर जॉनी वॉकर वॉल्ट कलेक्शनच्या लाँचला देखील टोस्ट देण्यात आला.
न्यूयॉर्कमधील या खास पार्टीला जगभरातील प्रसिद्ध कलाकारांनी हजेरी लावली. हंटर शेफर, लुपिता नियोंगो, रेगे-जान पेज आणि हेन्री गोल्डिंग यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते. परंतु यावेळी खरं आकर्षण ठरली ती प्रियांका चोप्रा. प्रियंका चोप्राने हिने ऑलिव्हियर रुस्ताँ यांच्या खास डिनरमध्ये आगळावेगळा लूक केला होता.
मेट गालाच्या बिनतोड राणीने फॅशन आणि वारशाचा उत्सव साजरा करणाऱ्या खास संध्याकाळी ऑलिव्हियर रूस्ताँला साथ दिली. ऑलिव्हियर रूस्ताँसोबतचा तिचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.