वानखेडे स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल 2025 मधील 56 वा सामना खेळण्यात येत आहे. गुजरातने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. त्यामुळे पहिल्या डावात मुंबईची बॅटिंग पाहायला मिळणार असल्याने पलटण चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. पलटणला रायन रिकेल्टन आणि रोहित शर्मा सलामी जोडीकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. मात्र ही सलामी जोडी मुंबईला चांगली सुरुवात देण्यात अपयशी ठरले. रायन रिकेल्टन 2 चेंडूत 2 धावा करुन आऊट झाला.
त्यानंतर लोकल बॉय रोहित शर्मा याने विल जॅक्स याच्यासह दुसऱ्या विकेटसाठी 24 धावा जोडल्या. रोहित गेल्या काही सामन्यांपासून सातत्याने धावा करत आहे. त्यामुळे चाहत्यांना रोहितकडून वानखेडे स्टेडियममध्ये मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र रोहितने चाहत्यांची निराशा केली. रोहितने 1 चौकारासह 8 बॉलमध्ये 7 रन्स केल्या आणि आऊट झाला. रोहित आऊट झाल्यानंतर गुजरात टायटन्सचा हेड कोच आशिष नेहरा याने आक्रमक सेलीब्रेशन केलं. आशिष नेहराने केलेलं सेलीब्रेशन सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
वॉशिंग्टन सुंदर याच्या जागी कमबॅक केलेल्या अर्शद खान याने मुंबईच्या डावातील चौथ्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर रोहित शर्मा याला आऊट केलं. अर्शदने रोहितला प्रसिध कृष्णा याच्या हाती कॅच आऊट केलं. रोहित आऊट होताच डगआऊमध्ये असलेल्या आशिष नेहरा याने जोरात टाळ्या वाजवल्या. नेहराने यासह गुजरात टीमचा उत्साह वाढवला. मात्र नेहराने केलेल्या या सेलिब्रेशनमधून रोहितची विकेट त्यांच्यासाठी किती महत्त्वाची आहे? हे स्पष्ट झालं.
आशिष नेहराचं आक्रमक सेलीब्रेशन
दरम्यान रोहितने या 18 व्या मोसमात आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत. रोहितने या 11 सामन्यांमध्ये 152.28 या स्ट्राईक रेटने आणि 30 च्या सरासरीने 197 बॉलमध्ये 300 रन्स केल्या आहेत. रोहितने या दरम्यान 3 अर्धशतकं झळकावली आहेत. तसेच रोहितने या मोसमात 17 षटकार आणि 28 चौकारही लगावले आहेत.