अभिनेता आणि गायक म्हणून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा दिलजीत दोसांझ पुन्हा एकदा चर्चेत आलाय. नुकत्याच पार पडलेल्या मेट गाला 2025 मध्ये त्याने हजेरी लावली. इतकेच नाही तर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी एक खास लुक आणि पोषाख परिधान केला. ज्यामध्ये त्याने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पंजाबी संस्कृतीचे प्रदर्शन केले. दिलजीतच्या पोषाखाची वैशिष्ट आणि इतिहास आपण पुढील माहितीत जाणून घेणार आहोत.
मेट गाला आणि दिलजीत दोसांझचा लूक
दरवर्षीनुसार मेट गालाचे यंदा ही आयोजन झाले होते. Met Gala 2025 मध्ये अनेक बॉलिवूडचे स्टार हटके लूकमध्ये दिसले. त्यामध्ये कियारा अडवाणी, शाहरुख खान असे अनेक स्टार्स सहभागी होते. त्यामध्ये सगळ्यांचे लक्ष वेधले ते रेड कार्पेटवर दिलजीतने पटियालामधील महाराज भुपिंदर सिंग यांना श्रद्धांजली म्हणून लुक तयार केला. त्यामध्ये दिलजीत दोसांझने एक पांढरी रॉयल शेरवानी, पगडी आणि फ्लोअर लेंथ कॅप असा सगळ्यात हटके पेहराव केला.
मेट गालामधील मुख्य चर्चा
दिलजीत दोसांझचा हा पोषाख अभिवाशा देवनानी यांनी डिझाइन केला आहे. लूक पुर्ण करण्यासाठी, दिलजीत दोसांझने त्याच्या पगडीला जुळणारा हेडपीस सुद्धा परिधान केला होता. मेट गालामध्ये एक हातात तलवार घेऊन दिलजीतने एक इतिहासच रचला आहे. पुढे आपण दिलजीत दोसांझच्या लूक बद्दलचा इतिहास जाणून घेणार आहोत.
महाराजांबद्दल माहिती
भूपिंदर सिंग हे पंजाबातील पटियाला संस्थानाचे सुप्रसिद्ध महाराजा होते. त्यांचा जन्म १२ ऑक्टोबर १८९१ रोजी झाला आणि त्यांनी १९०० ते १९३८ या काळात पटियाला राज्याचे राज्यकारभार सांभाळला. महाराजांना त्यांच्या शाही वैभव आणि आलिशान जीवनशैलीसाठी ओळखले जाते.
त्यांनी जगातील काही महागड्या कार, हिरे, मोत्यांचा संग्रह केला होता. भारतीय क्रिकेट आणि हॉकीच्या उभारणीत भूपिंदर सिंग यांचे मोठे योगदान होते. त्यांनी पटियाला क्लबची स्थापना केली. शिक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रात त्यांनी अनेक संस्था उभारल्या. पटियाला स्टेट मर्डन स्कूल हि त्यांची एक देणगी.