Operation Sindoor : पाकिस्तान, पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर केलेल्या हवाई कारवाईनंतर काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
esakal May 07, 2025 02:45 PM
पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकनंतर धर्मशाला, लेह, जम्मू, श्रीनगर, अमृतसर विमानतळ बंद

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतीय लष्कराने बदला घेतला आहे. भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर हल्ला केला. सध्याच्या या परिस्थितीमुळे, धर्मशाळा (DHM), लेह (IXL), जम्मू (IXJ), श्रीनगर (SXR) आणि अमृतसर (ATQ) यासह उत्तर भारतातील काही भागांमधील विमानतळे पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत.

Operation Sindoor : एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानील बहावलपूरमध्ये ३० जणांचा मृत्यू

भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ले केले आहेत. एकाच वेळी ९ ठिकाणी हल्ला करण्यात आला आहे. दरम्यान, या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानील बहावलपूरमध्ये ३० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे. पाकिस्तानमधील बहावलपूरमधील रुग्णालयांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहावलपूरमध्ये इंटरनेट बंद होण्याची शक्यता आहे.

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्रभर 'ऑपरेशन सिंदूर'वर सतत होते लक्ष ठेवून

पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्रभर ऑपरेशन सिंदूरवर सतत लक्ष ठेवून आहेत. सर्व नऊ लक्ष्यांवर करण्यात आलेला हल्ला यशस्वी झाला आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतीय लष्कराने बदला घेतला आहे. भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर हल्ला केला.

Ajit Doval : अजित डोवाल यांनी अमेरिकेच्या एनएसए, परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी केली चर्चा, भारताच्या मोठ्या कारवाईबद्दल काय म्हणाले?

भारतराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेच्या NSA आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी संवाद साधला, भारताच्या मोठ्या कारवाईबद्दल माहिती दिली. भारताच्या प्रत्युत्तरात्मक कारवाईनंतर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी अमेरिकेचे NSA आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी संवाद साधला आणि भारताने घेतलेल्या मोठ्या पावलांबाबत त्यांना सविस्तर माहिती दिली. या चर्चेमध्ये भारताकडून अलीकडेच करण्यात आलेल्या निर्णायक कारवाईची माहिती देण्यात आली असून, भारताच्या सुरक्षेशी संबंधित घडामोडींबाबत अमेरिका सरकारला विश्वासात घेतलं गेलं आहे. डोवाल यांनी भारताने दहशतवादाविरोधात घेतलेल्या भूमिकेवर आणि "ऑपरेशन सिंदूर" सारख्या निर्णायक मोहिमांबाबत अमेरिकेला स्पष्टपणे माहिती दिली. ही चर्चा भारत-अमेरिका संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात असून, दोन्ही देश दहशतवादविरोधी लढ्याबाबत सहकार्य वाढवण्यास तयार आहेत.

Donald Trump : पाकिस्तान, पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर केलेल्या हवाई कारवाईनंतर काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?

पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर केलेल्या हवाई कारवाईनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ट्रम्प यांनी ही संपूर्ण परिस्थिती "शर्मनाक" असल्याचं सांगत दोन्ही देशांनी संयम बाळगावा व लवकरात लवकर हे थांबावं, अशी आशा व्यक्त केली.

Operation Sindoor : एअर स्ट्राईकनंतर भारतीय लष्कराचे मोठे विधान; म्हणाले, 'पाकिस्तानशी लढणे हे आमचे ध्येय...'

Operation Sindoor : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतीय सैन्याने मंगळवारी उशिरा रात्री पाकिस्तानमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राईक केलीये. या एअर स्ट्राईकनंतर संरक्षण मंत्रालयाकडून (Ministry of Defence) जारी केलेल्या प्रेस नोटमध्ये सांगण्यात आलंय, की ‘ऑपरेशन सिंदूर’चे उद्दिष्ट केवळ दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करणे होते. भारताने हा हल्ला शेजारील देशासोबत वाद घालण्यासाठी केलेला नाहीये, असं स्पष्ट करण्यात आलंय.

पहलगामचा बदला : ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताची मोठी कारवाई, पाकिस्तानातील ९ ठिकाणी एअर स्ट्राईक

भारताने दहशतवादाविरोधातील आपल्या संघर्षाला निर्णायक वळण देत ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. या विशेष मोहिमेंतर्गत भारतीय वायुदलाने पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीर (PoK) येथील ९ दहशतवादी तळांवर अचूक एअर स्ट्राईक केली. ही कारवाई मध्यरात्रीनंतर सुमारे १.३० वाजता पार पडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वायुदलाने बहावलपूर, कोटली आणि मुजफ्फराबाद या भागांतील दहशतवादी तळांना लक्ष्य करत अत्यंत नियोजनबद्ध आणि अचूक हल्ला केला. या कारवाईसाठी आधीपासूनच बारकाईने योजना आखण्यात आली होती. हे सर्व हल्ले अत्यंत सावधगिरीने आणि धोरणात्मक पद्धतीने करण्यात आले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.