एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी ऑपरेशन सिंदूरवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानातील दहशतवादी तळावंर भारतीय सैन्याने केलेल्या हल्ल्याचं स्वागत करतो. पाकिस्तानला अशी अद्दल घडवली गेली पाहिजे की पुन्हा कधीही दुसरं पहलगाम होणार नाही. तेथील दहशतवादला पूर्णपणे नष्ट केलं गेलं पाहिजे. जय हिंद, अशा शब्दात त्यांनी हा कारवाईचं स्वागत केलं आहे.
Donald Trump On Operation Sindoor : भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रियाभारतानं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदल्यासाठी केलेल्या कारवाईवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. भारताचे केलेली कारवाई 'इट इज शेम' अशी प्रतिक्रिया ट्रम्प त्यांनी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना भारताच्या ऑपरेशन सिंदूर संदर्भात प्रश्न विचारला असता ते म्हणाले, आम्ही याबाबत ऐकलं आहे. इट इज शेम, अपेक्षा आहे की हे सर्व लवकरात लवकर संपेल. हे दोन देश अनेक शतकांपासून एकमेकांशी संघर्ष करत आहेत. मला आशा आहे की हे सगळं लवकर संपेल.
Rajnath Singh : ऑपरेशन सिंदूरनंतर राजनाथ सिंह यांचं सूचक ट्विटभारतीय लष्कराने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. पाकिस्तानच्या हद्दीत घुसुन दहशतवादी अड्डे लष्कराने उध्वस्त केलेत. या मोहीमेला भारताने ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं आहे. मध्यरात्री भारताने पीओके मध्ये केलेल्या कारवाईनंतर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 'भारत माता की जय' असं सूचक ट्विट करत विजय आपलाच होईल असे संकेत दिले आहेत.
अखेर भारतीय लष्कराने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. पाकिस्तानच्या हद्दीत घुसुन दहशतवादी अड्डे लष्कराने उध्वस्त केले आहेत. भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबादमध्ये दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. भारतानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी तळांवर हल्ला केला. याला 'ऑपरेशन सिंदूर' असं नाव देण्यात आलं आहे. एकूण नऊ ठिकाणी हा हल्ला करण्यात आला आहे.