Mumbai Indians’ playoff dream in danger: After GT defeat
ने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये सलग सहा विजयांची नोंद करून प्ले ऑफच्या शर्यतीत झेप घेतली. पण, काल वानखेडे स्टेडियमवर त्यांच्या विजयी मालिकेत खंड पडला. गुजरात टायटन्सने थरारक लढतीत शेवटच्या चेंडूवर मुंबईला मात दिली. पावसामुळे गुजरातसमोर १९ षटकांत १४७ धावांचे लक्ष्य ठेवले गेले आणि त्यांना ६ चेंडूंत १५ धावा विजयासाठी हव्या होत्या. दीपक चहरने शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच नेली खरी, परंतु गुजरातने मॅच जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली.
पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सला या पराभवाचा फटका बसला आहे. ७ एप्रिल २०२५ नंतर मुंबई इंडियन्सचा हा पहिला पराभव आहे. कालचा सामना जिंकून मुंबई इंडियन्सला १६ गुणांसह आपले अव्वल चार संघांमधील स्थान मजबूत करता आले असते, परंतु आता चित्र बदलले आहे. मुंबई इंडियन्सने १२ पैकी ७ सामने जिंकले आहेत आणि १४ गुणांसह ते चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांचा नेट रन रेट हा १.१५६ हा अन्य संघांपेक्षा दमदार आहे. पण, आता त्यांचे फक्त दोनच सामने शिल्लक आहेत, तर अन्य संघांचे प्रत्येकी ३ सामने आणखी बाकी आहेत.
MI’s qualification scenarioमुंबई इंडियन्सने उर्वरित दोन्ही सामने जिंकल्यास प्ले ऑफमधील स्थान पक्के
दोनपैकी १ विजय व १ पराभव असा निकाल लागल्यास पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाइट रायडर्स व लखनौ सुपर जायंट्स यांच्यावर त्यांचे गणित अवलंबून असेल
दोन्ही सामने गमावल्यास त्यांचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात येईल.
मुंबई इंडियन्सला उर्वरित दोन सामन्यांत पंजाब किंग्स ( ११ मे अवे) व दिल्ली कॅपिटल्स ( १५ मे होम) यांचा सामना करायचा आहे. पंजाब किंग्स ११ सामन्यांत १५ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर दिल्लीचे ११ सामन्यांत १३ गुण आहेत.
मुंबई इंडियन्सने दोन्ही सामने जिंकल्यास ते १८ गुणांसह अव्वल दोन स्थानांमध्ये राहू शकतात. पण, गुजरात टायनटन्स व रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू यांचे प्रत्येकी १६ गुण आहेत आणि त्यांचे तीन सामने शिल्लक आहेत. ते २२ गुणांपर्यंत जाऊ शकतात.