डोंबिवली - मंगळवारी रात्री कल्याण डोंबिवली शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस आला. या वाऱ्यामुळे रात्री साडे नऊच्या सुमारास कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात धावत्या रिक्षेवर पडले भलेमोठे गुलमोहरचे झाड पडले. झाड रिक्षावर पडल्याने रिक्षाचे मोठे नुकसान झाले.
तसेच घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, कल्याण डोंबिवली महापालिका कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. तब्बल एक तासाचा रेस्क्यू केल्यानंतर रिक्षा बाहेर काढण्यात आली. या रिक्षात तीन जण अडकून पडले होते.
त्यांना बाहेर काढल्यावर तात्काळ कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणी बाई रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र तिघांचा मृत्यू झाला असून यात दोन महिला आणि एक पुरुष असल्याची प्राथमिक माहिती अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी दिली.