पहलगाममधील हल्ल्याची जबाबदारी टीआरएफने घेतली असून दहशतवाद्यांची ओळख देखील पटली आहे. तपासात या हल्ल्याचा पाकिस्तानशी थेट संबंध असल्याचं उघडकीस आलं असून पाकिस्तानच दहशतवादाचा बालेकिल्ला असल्याचं वक्तव्य आजच्या पत्रकार परिषदेत बोलताना विक्रम मिसरी यांनी केलं.
'ऑपरेशन दरम्यान निष्पाप नागरिकांची काळजी घेतली - कर्नल सोफिया कुरेशी'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान निष्पाप नागरिकांची काळजी घेण्यात आली; अशी माहिती भारतीय लष्कराच्या पत्रकार परिषदेमध्ये कर्नल सोफिया कुरेशी यांनी माहिती दिली.
Pahalgam Attack : जम्मू काश्मीरच्या विकासाला धक्का बसावा यासाठीच हल्लापहलगाम येथील दहशवादी हल्ला जम्मू काश्मीरच्या विकासाला धक्का बसावा यासाठीच केल्याचं भारतीय लष्कराने स्पष्ट केलं आहे. तपासात पाकिस्तानचे दहशतवाद्यांशी असलेले संबंध आले उघडकीस. पाकिस्तानातून भारतात आणखी हल्ला होऊ शकतात, अशी गुप्त माहिती समोर आल्याचंही लष्कराने पत्रकार परिषदेत सांगितलं.
Operation Sinoor : ऑपरेशन सिंदूर नियोजितच होतं...भारतानं दहशतवादी हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी आणि संभाव्य दहशतवादाला थांबवण्यासाठी भारताने आपल्या अधिकारांचा वापर केला आहे. ही कारवाई नियोजित होती, असं लष्कराकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
भारतीय लष्कराच्या पत्रकार परिषदेला सुरूवातभारतीय लष्कराच्या पत्रकार परिषदेला सुरूवात झाली असून या पत्रकार परिषदेत हल्ला करणारा गट लष्कर ए तय्यबाशी संबंधित असून पहलगाम येथील तपासानुसार पाकिस्तानचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचं उघड झालं आहे. तपास यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांची ओळख पटली असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं.
ऑपरेशन सिंदूर,संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रियाऑपरेशन सिंदूरऑपरेशन सिंदूरवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी यावर दोन शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटवर जय हिंद! असे म्हणत ऑपरेशन सिंदूरचे पोस्टर शेअर केले आहे.
अजित डोवल पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखलपहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी करण्यात आलेल्या एअर स्ट्राईक यशस्वी झाल्यानंतर आज सकाळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले.
‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी केल्याबद्दल भारतीय सैन्यदलांचे अभिनंदन - अजित पवारभारताने दहशतवादाविरुद्ध कणखर भूमिका घेत पहलगाममधील हल्ल्याला चोख प्रत्युत्तर म्हणून आज पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले करून नष्ट केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय सैन्यदलांचे आणि ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सहभागी झालेल्या सैनिकांचे अभिनंदन केले आहे. भारतीय सैनिकांच्या क्षमतेवर देशाला पूर्ण विश्वास असून संपूर्ण देश एकजुटीने त्यांच्यामागे उभा आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कारवाईचे समर्थन, कौतुक केले आहे.
Sharad Pawar On Operation Sindoor : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला - शरद पवारभारती लष्कराने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकडे स्वागत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, आपल्या छातीवर गोळ्या झेलून भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्यदलावर प्रत्येक भारतीयाचा पूर्ण विश्वास आहे. आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी एअर स्ट्राईक करून, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला.
या कारवाईत पाकिस्तानी नागरिक किंवा पाक लष्कराच्या कोणत्याही ठिकाणाला धक्का न लावता, अतिरेक्यांच्या नऊ लक्ष्यांवर अचूक आणि नियोजित हल्ला करण्यात आला. भारतीय सैन्याच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे.
भारताचे सार्वभौमत्व आणि नागरिकांची सुरक्षा अबाधित राखणाऱ्या तसेच पहलगाम हल्ल्याचा योग्य प्रत्युत्तर देणाऱ्या सर्व भारतीय जवानांचे मन:पूर्वक अभिनंदन!
जय हिंद!
काश्मीरमधील सर्व विमानतळ बंदपहलगाम हल्ल्यानंत भारताने पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राईक केला. या कारवाईमध्ये 90 दहशतवादी मारले गेल्याची माहिती आहे, दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव जम्मू-काश्मीरमधील सर्व विमानतळ बंद ठेवण्यात आली आहेत.
Operation Sindoor : दहशतवादला पूर्णपणे नष्ट केलं गेलं पाहिजे - असदुद्दीन ओवैसीएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी ऑपरेशन सिंदूरवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानातील दहशतवादी तळावंर भारतीय सैन्याने केलेल्या हल्ल्याचं स्वागत करतो. पाकिस्तानला अशी अद्दल घडवली गेली पाहिजे की पुन्हा कधीही दुसरं पहलगाम होणार नाही. तेथील दहशतवादला पूर्णपणे नष्ट केलं गेलं पाहिजे. जय हिंद, अशा शब्दात त्यांनी हा कारवाईचं स्वागत केलं आहे.
Donald Trump On Operation Sindoor : भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रियाभारतानं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदल्यासाठी केलेल्या कारवाईवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. भारताचे केलेली कारवाई 'इट इज शेम' अशी प्रतिक्रिया ट्रम्प त्यांनी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना भारताच्या ऑपरेशन सिंदूर संदर्भात प्रश्न विचारला असता ते म्हणाले, आम्ही याबाबत ऐकलं आहे. इट इज शेम, अपेक्षा आहे की हे सर्व लवकरात लवकर संपेल. हे दोन देश अनेक शतकांपासून एकमेकांशी संघर्ष करत आहेत. मला आशा आहे की हे सगळं लवकर संपेल.
Rajnath Singh : ऑपरेशन सिंदूरनंतर राजनाथ सिंह यांचं सूचक ट्विटभारतीय लष्कराने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. पाकिस्तानच्या हद्दीत घुसुन दहशतवादी अड्डे लष्कराने उध्वस्त केलेत. या मोहीमेला भारताने ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं आहे. मध्यरात्री भारताने पीओके मध्ये केलेल्या कारवाईनंतर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 'भारत माता की जय' असं सूचक ट्विट करत विजय आपलाच होईल असे संकेत दिले आहेत.
अखेर भारतीय लष्कराने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. पाकिस्तानच्या हद्दीत घुसुन दहशतवादी अड्डे लष्कराने उध्वस्त केले आहेत. भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबादमध्ये दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. भारतानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी तळांवर हल्ला केला. याला 'ऑपरेशन सिंदूर' असं नाव देण्यात आलं आहे. एकूण नऊ ठिकाणी हा हल्ला करण्यात आला आहे.