सध्या बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटांची मेजवानी पाहायला मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' (Zapuk Zupuk) , सई ताम्हणकरचा 'गुलकंद' (Gulkand ) आणि भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांचा 'आता थांबायचं नाय' चित्रपट प्रेक्षकांचे बंपर मनोरंजन करत आहे. 'झापुक झुपूक' चित्रपट ही एक प्रेमकथा आहे.
'' कॉमेडी चित्रपट असून यात नात्यांमधली गुंतागुंत, भावना यांचा सुरेख मेळ दाखवण्यात आला आहे. 'आता थांबायचं नाय!' (Ata Thambaycha Naay ) हा चित्रपट भावनिक, मनोरंजक, प्रेरणादायक आणि सत्यकथेवर आधारित आहे. या तिन्ही चित्रपटांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊयात.
'झापुक झुपूक' बॉक्स ऑफिस कलेक्शन'बिग बॉस मराठी 5' चा विजेता चव्हाणचा 'झापुक झुपूक' चित्रपट प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. मात्र आता या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मोठी घट झालेली पाहायला मिळत आहे. 'झापुक झुपूक' चित्रपट केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला आहे. '' चित्रपट 25 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'झापुक झुपूक' चित्रपटाने आतापर्यंत जवळपास जगभरात 1 कोटी 29 लाखांचा व्यवसाय केला आहे.
मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरचा 'गुलकंद' चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुसाट पळत आहे. या चित्रपटाने सूरजच्या 'झापुक झुपूक' चित्रपटाला देखील मागे टाकले आहे. 'गुलकंद' चित्रपट 1 मे ला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सई ताम्हणकर आणि समीर चौघुलेची जोडी चाहत्यांना खूपच आवडली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'गुलकंद' चित्रपटाने जगभरात जवळपास 2 कोटी 52 लाखांची कमाई केली आहे.
'झापुक झुपूक' आणि 'गुलकंद' सोबत बॉक्स ऑफिसवर 'आता थांबायचं नाय' हा चित्रपट देखील प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. या चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव हे मोठे कलाकार पाहायला मिळत आहे. 'आता थांबायचं नाय' चित्रपट 1 मे ला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'आता थांबायचं नाय' चित्रपटाने जगभरात 1 कोटी 44 लाखांचा व्यवसाय केला आहे.