Virat Kohli Avneet Kaur News: भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने अभिनेत्री अवनीत कौरच्या एका इंस्टाग्राम पोस्टला दिलेल्या 'लाइक'मुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली. या एका कृतीने अवनीतच्या इंस्टाग्राम फॉलोअर्समध्ये तब्बल 20 लाखांची वाढ झाली, आणि तिच्या ब्रँड व्हॅल्यूतही लक्षणीय वाढ झाली. या घटनेनंतर अवनीतच्या पोस्टची किंमत 2 लाख रुपयांवरून 2.6 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
विराट कोहलीने या 'लाइक'बाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, "फीड क्लिअर करताना इंस्टाग्रामच्या अल्गोरिदममुळे चुकून लाईक बटन दाबलं गेलं. यामागे कोणताही हेतू नव्हता." मात्र, या स्पष्टीकरणानंतरही सोशल मीडियावर चर्चा थांबली नाही. अनेकांनी यावर मीम्स तयार केले, आणि अवनीतच्या कमेंट सेक्शनमध्ये विराट कोहलीचे GIFs आणि कमेंट पाहायला मिळाल्या.
या अनपेक्षित प्रसिद्धीमुळे अवनीत कौरला विविध ब्रँड्सकडून 12 नवीन एंडोर्समेंट डील्स मिळाल्या आहेत, ज्यात ब्यूटी, फॅशन आणि फिनटेक क्षेत्रातील ब्रँड्सचा समावेश आहे. या संधींमुळे तिच्या एकूण कमाईतही लक्षणीय वाढ झाली आहे. 2024 मध्ये तिची नेट वर्थ अंदाजे 25 कोटी होते. परंतु या घटनेनंतर ते 43 कोटींपर्यंत वाढल्याचे अहवाल दर्शवतात. या संपूर्ण घटनेने सिद्ध केले की, सोशल मीडियावरील एक छोटीशी कृतीही कोणाच्या करिअरला मोठा वळण देऊ शकते.
ने बाल कलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली होती, आता अवनीत 'लव्ह इन व्हिएतनाम' या आगामी चित्रपटात झळकणार आहे. तसेच, ती '' या हॉलिवूड चित्रपटात टॉम क्रूझसोबत दिसण्याची शक्यता आहे.