Shikhar Dhawan Roasts Shahid Afridi on Air Strike Silence
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांवर ‘’ कारवाई केली. भारताच्या स्टार क्रिकेटपटू शिखर धवनने ट्विटरवरून पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीवर अप्रत्यक्षपणे चहा-पोस्टद्वारे जोरदार निशाणा साधला. शिखर धवनने आधीच्या ट्विटमध्ये म्हटले होते की, 'भारताने दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाई केली आहे, भारत माता की जय.' शिखर धवनची ही पोस्ट व्हायरल होताच नेटिझन्सनी आफ्रिदीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी हा आफ्रिदी कुठेय, असा सवाल केला.
काश्मीरमधील येथे २२ एप्रिल रोजी भीषण दहशतवादी हल्ल्या झाला आणि त्यात २५ भारतीय नागरिक आणि एक नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला. त्यानंतर संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली. २०१९ मधील पुलवामा हल्ल्यानंतरचा हा सर्वात भयंकर हल्ला ठरला. यानंतर आफ्रिदीने एका पाकिस्तानी वाहिनीवर बोलताना भारतीय सैन्याचा उपहास केला होता. तो म्हणाला होता की,"तुमचं आठ लाखांचं सैन्य आहे काश्मीरमध्ये आणि तरीही हल्ला झाला? म्हणजे तुम्ही निकम्मे आहात. लोकांना सुरक्षितता देता आली नाही."
भारताचा गब्बरने त्याला सडेतोड उत्तर दिले होते आणि त्यानंतर आफ्रिदीने त्याला चहा पिण्याचे आमंत्रण दिले होते. त्यावरून आज धवनने ट्विट करून,' शेजाऱ्यांनो चहा कशी वाटली.. असे ट्रोल केले.' यानंतर शाहिद आफ्रिदी सोशल मीडियावर ट्रोलिंगचा केंद्रबिंदू बनला.
पहलगाममधील हल्ल्यानंतर सोशल मीडियावर आफ्रिदी आणि धवन यांच्यात जोरदार वादविवाद झाला होता. शिखरने आधी लिहिले होते, कारगिलमध्येही आम्ही तुमचा पराभव केला होता, तुम्ही आधीच इतके खाली पडला आहात, तुम्ही किती खाली पडाल? अनावश्यक टिप्पण्या करण्यापेक्षा तुमच्या देशाच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. आम्हाला आमच्या भारतीय सैन्याचा खूप अभिमान आहे. भारत माता चिरंजीव होवो! जय हिंद.
भारतीय सैन्याच्या या कारवाईनंतर माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर, आकाश चोप्रा आणि प्रग्यान ओझा, सुरेश रैना, इरफान पठाण, वीरेंद्र सेहवाग यांनी लष्कराचे कौतुक केले.