PBKS vs RCB क्वॉलिफायर 1 चा सामना रद्द झाला तर फायनलचं तिकीट कोणाला? जाणून घ्या नियम
GH News May 28, 2025 08:07 PM

आयपीएल 2025 स्पर्धेतील साखळी फेरीचे सामना संपले असून 29 मे पासून प्लेऑफचा थरार रंगणार आहे. क्वॉलिफायर 1 सामन्यात पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना मोहालीच्या मुल्लांपूर स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यातील विजेता संघाला थेट अंतिम फेरीचं तिकीट मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी बाजी पणाला लावतील यात काही शंका नाही. पण या सामन्यात पावसाने हजेरी लावली तर काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सामना रद्द करण्याची वेळ आली तर अंतिम फेरीचं तिकीट कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? जाणून घ्या बीसीसीआयने काय नियम आखले आहेत ते..

क्वॉलिफायर 1 सामना रद्द झाला तर कोण अंतिम फेरीत खेळणार?

आयपीएल 2025 स्पर्धेत पंजाब किंग्स आणि आरसीबी या दोन्ही संघांना जेतेपदाची आस आहे. या दोन्ही संघांची जेतेपदाचं स्वप्न मागच्या 17 पर्वात पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे स्वप्नपूर्तीसाठी दोन्ही संघ सर्वस्वी पणाला लावतील यात काही शंका नाही. पण या सामन्यात पावसाने हजेरी लावली आणि सामना रद्द करण्याची वेळ आली तर काय? यापूर्वी साखळी फेरीत सामना रद्द करण्याची वेळ आली आहे. पण त्यावेळेस प्रत्येकी एक एक गुण वाटून हिशेब चुकता केला होता. मात्र आता अंतिम फेरीचं तिकीट कोणाला मिळणार हा प्रश्न आहे. पावसामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे सामना रद्द करण्याची वेळ आली तर एका संघाला अंतिम फेरीचं तिकीट मिळेल. तर एक संघ क्वॉलिफायर 2 मध्ये खेळेल.

गुणतालिकेत टॉपला असलेल्या संघाला याचा फायदा मिळेल. म्हणजेच पंजाब किंग्स संघाकडे थेट अंतिम फेरी गाठण्याचं गुणांकन आहे. कारण गुणतालिकेत टॉपला आहे. तर आरसीबी दुसऱ्या स्थानी आहे. दोन्ही संघांचे प्रत्येक 19 गुण आहेत. पण पंजाब नेट रनरेटच्या बाबतीत पुढे आहे. जर क्वालिफायर-1 सामना रद्द झाला तर पंजाब किंग्स अंतिम फेरीत पोहोचेल आणि आरसीबीला क्वालिफायर-2 खेळावे लागेल.

पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांचे प्रत्येकी 19 गुण आहेत. दोन्ही संघांनी साखळी फेरीत 9 सामने जिंकले आहेत. तर 4 सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. तर एक सामना पावसामुळे रद्द झाल्याने प्रत्येकी एक गुण मिळाला आहे. पण पंजाब किंग्स आरसीबीपेक्षा +0.071 नेट रनरेटने पुढे आहे. पंजाब किंग्सचे +0.372, आरसीबीचा 0.301 नेट रनरेट आहे. त्यामुळे पंजाब किंग्स गुणतालिकेत टॉपला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.