Adnan Sami On Operation Sindoor: गायक अदनान सामी याने भारतीय लष्कराच्या 'ऑपरेशन सिंदूर'वर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ७ मे रोजी पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. या कारवाईनंतर अदनान सामी याने 'जय हिंद!! #OperationSindoor' असे ट्विट करत भारतीय लष्कराचे समर्थन केले
याने 'सिंदूर से तंदूर तक' असा मजेशीर पोस्ट शेअर करत पाकिस्तानवर ताशेरे ओढले. त्यांनी पाकिस्तानी न्यूज अँकरवरही 'AAAAL IS WELLLL' असे म्हणत उपरोधिक टीका केली. या पोस्ट्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्या आहेत.
अदनान सामी याने काही दिवसांपूर्वी अजरबैजानमध्ये भेटलेल्या पाकिस्तानी तरुणांबद्दल सांगितले. तो म्हणाला, "त्याने मला सांगितले की, 'सर, तुम्ही पाकिस्तान वेळेवर सोडलेत. आम्हालाही नागरिकत्व बदलायचे आहे. आम्ही आमच्या लष्कराचा तिरस्कार करतो.' मी उत्तर दिले, 'माझ्या हे आधीच लक्षात आले होते.'"
२०१६ मध्ये भारतीय नागरिकत्व मिळवलेल्या अदनान सामी याने यापूर्वीही पाकिस्तानच्या धोरणांवर टीका केली आहे. ''नंतर त्याच्या पोस्ट्सने सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. काहींनी त्याचे समर्थन केले, तर काहींनी त्याच्यावर टीका केली. तथापि, अदनान सामी याने आपल्या प्रतिक्रियांद्वारे भारताच्या दहशतवादविरोधी कारवाईचे समर्थन केले आहे.