Operation Sindoor Live Update: Nashik Mock Drill : नाशिकमध्ये मॉक ड्रिल
Saam TV May 08, 2025 01:45 AM
Nashik Mock Drill : नाशिकमध्ये मॉक ड्रिल

नाशिक - केटीएचएम कॉलेज परिसरात आज मॉक ड्रिल पार पडले. यामध्ये नागरी संरक्षण दल, अग्निशमन दल, पोलीस विभाग, आपत्ती व्यवस्थापन, एनसीसी यांसह होमगार्डचं पथकही मॉक ड्रिलमध्ये सहभागी होते.

Mock Drill : पिंपरी-चिंचवड शहराने अनुभवला एअर स्ट्राइकचा अनुभव

शत्रू राष्ट्राने हल्ला केल्यानंतर नेमकी कशा प्रकारची परिस्थिती उद्भवू शकते आणि त्यातून कशाप्रकारे बचाव कार्य करावे याचं प्रात्यक्षिक आज पिंपरी चिंचवड महापालिकेत सादर करण्यात आलं. महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल, आरोग्य विभाग, पोलीस विभाग यांनी संयुक्तपणे आज पिंपरी-चिंचवड महापालिकेत हे मॉक ड्रिल घेण्यात आले.

Mumbai Rain : मुंबईत तुफान पाऊस, वादळी वाऱ्यानं झोडपलं

मुंबईसह उपनगरांत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं. संध्याकाळपर्यंत ते कायम होते. त्यानंतर काही ठिकाणी पाऊस कोसळला. यामुळं नोकरदार वर्गाची तारांबळ उडाली.

Kalyan Mock Drill : कल्याणमध्ये मॉक ड्रिल सुरू

कल्याणमधील यशवंतराव चव्हाण क्रिडांगणात मॉक ड्रिल सुरू

आधी सायरन, नंतर स्फोटाचा आवाज

आपत्कालीन यंत्रणा मदतीसाठी धावली.

बिल्डिंगमध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका

मॉक ड्रिल बघण्यासाठी कल्याणकरांची गर्दी

Nashik Rain : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा तडाखा

नाशिक : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली.

नाशिक शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी

अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ

कांद्यासह अन्य पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता

Mock Drill In Pune : पुण्याच्या विधानभवनात मॉक ड्रिल सुरुवात

पुण्याच्या विधानभवनात मॉक ड्रिलला सुरुवात

प्रशासन आणि यंत्रणेचे अधिकारी, कर्मचारी परिसरात पोहोचले

पुणे पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य विभाग, एनडीआरएफ यांसह इतर यंत्रणांचे अधिकारी येण्यास सुरुवात

Mock Drill at CSMT : मुंबईत CSMT वर मॉक ड्रिल

भारत आणि पाकिस्तान या दोन देशांत तणाव वाढला आहे. कोणत्याही क्षणी युद्ध होण्याची भीती व्यक्त केली जाते. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने देशभरात मॉक ड्रिलचे आयोजन केले आहे. त्यानुसार, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच सीएसएमटी (CSMT) स्थानकात मॉक ड्रिल घेण्यात आले.

Operation Sindoor : भारताच्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानात खळबळ, अर्थमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली

भारतानं पाकिस्तानवर एअर स्ट्राइक केला. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय लष्करानं ही कारवाई केली आहे. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांनी तातडीने बैठक बोलावली.

Sharad Pawar: शरद पवार यांनी संरक्षण मंत्र्यांशी साधला संवाद

शरद पवार यांनी ऑपरेशन 'सिंदूर'च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री यांच्याशी संवाद साधला

X वर पोस्ट शेअर करत दिली माहिती

भारतीय सशस्त्र दलांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि त्यांनी केलेल्या कारवाईसाठी त्यांचे अभिनंदनही केले

या कठीण काळात सरकारला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याची ग्वाही दिली

Sanjay Jadhav: पाकिस्तान वरील कारवाईचे स्वागत भारतीय सैन्याचे अभिनंदन- खासदार संजय जाधव

पाकिस्तानवर केलेली कारवाई ही खरोखरच अभिनंदन आहे या कारवाईचे स्वागत करतो तसेच.भारतीय सैन्य दलाचे अभिनंदन.परंतु आता एवढ्यावरच न थांबता भारताने त्यांना अजुन चोख प्रत्युत्तर द्यायला हव ते तसे आले तसेच त्यांना प्रत्युत्तर देणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया परभणीचे उबाठा खासदार संजय जाधव यांनी दिली आहे.

Operation Sindoor: भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकनंतर रायगड जिल्ह्यात आनंदोत्सव

० भारताने पाकिस्तानी भागात केलेल्या एअर स्ट्राईक नंतर रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये आनंदोत्सव

० फटाके फोडून आणि पेढे वाटून केला आनंद व्यक्त

० पाकिस्तान विरोधी घोषणां बरोबर भारताचा जयघोष

० सेनादलाचा देखील केला जयजयकार

LTT: लोकमान्य टिळक टार्मिनलला मॉक ड्रिल

लोकमान्य टिळक टार्मिनल या ठिकाणी जी आर पी आणि आर पी एफ यांचा संयुक्त मॉक ड्रिल..

या मध्ये पोलिसांकडून प्रवाश्यांना आपतकालीन परिस्थिती बद्दल माहिती देणार..

काल केंद्र सरकार कडून देण्यात आलेल्या गाईड लाईन्स चे यात पालन केले जाणार..

तर लोकमान्य टिळक टार्मिनल या ठिकाणाहून मोठ्या संख्येने लोक बाहेरगावी जात असतात..

लोकमान्य टिळक टर्मिनसवर मॉक ड्रिलच्या तयारीला सुरूवात

केंद्र सरकारच्या आदेशानुसार देशातील अनेक ठिकाणी आज मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. मॉक ड्रिलच्या तयारीला सुरूवात झाली असून, लोकमान्य टिळक टर्मिनसवर मॉक ड्रिलच्या तयारीला सुरूवात झाली आहे.

एअर स्ट्राइकनंतर डोंबिवली शहर शाखेकडून जल्लोष

भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राईक करत दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतल्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या डोंबिवली शहर शाखेकडून जल्लोश

शिवसेना शहर शाखेबाहेर ढोल ताशांच्या गजरात "सिंधुर" हातात घेत ,तिरंगा हातात फडकवत साजरा केला आनंद उत्सव

पाकिस्तानचे झेंडे फाडले

शिवसेना आमदार राजेश मोरे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी साजरा केला आनंदउत्सव

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांचा जल्लोष

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून हवाई हल्ला केल्यानंतर शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी रुग्णालयाच्या बेडवरून हातात राष्ट्रध्वज घेऊन आनंद साजरा केला.

शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी त्यांना दोन महिने बेड रेस्टवर राहण्याचा सल्ला दिला आहे. तो उठू शकत नाही आणि चालूही शकत नाही. त्यानंतरही, भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून केलेल्या हवाई हल्ल्याबद्दल हातात तिरंगा घेऊन भारत माता की जय म्हणत भारतीय सैन्य आणि पंतप्रधानांचे अभिनंदन केले आहे.

PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींना कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक बोलावली

पंतप्रधान नरेंद्र मोदींना कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात येणार आहे.

Operation Sindoor: उद्या राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक

उद्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक होणार आहे. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात येणार आहे.

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरवर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया

भारतीय लष्कराने पाकिस्तानातील 9 दहशतवादी स्थळांवर हल्ला केल्यानंतर देशभरातून कौतुक केलं जात आहे. यानंतर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील प्रतिक्रिया देत लष्कराने केलेल्या कामाचं शब्दांनी कौतुक करता येत नाही इतकं सुंदर काम लष्कराने केल्याचे असं म्हणत लष्कराचा अभिनंदन केलं आहे. भारत स्वतःहून कोणाची छेडखानी करत नाही मात्र केलं तर सोडायचं नाही ही कारवाई योग्य असल्याचं अण्णांनी म्हटले आहे. काही कारण नसतांना आमचे 26 लोक मारले त्याचा बदला भारताने घेतला त्यामुळे कोणी काही बोलू शकत नाही, अशा प्रकारे कारवाई केल्याने आता कुणाची हिंमत होणार नाही अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली आहे.

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरवर माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची प्रतिक्रिया

पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने घेतलेल्या कठोर भूमिकेनुसार भारतीय वायुसेनेने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत जोरदार कारवाई करत दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले. या एअर स्ट्राईकमुळे आपल्या माथ्यावरचं कुंकू गमावलेल्या भगिनींना खरी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे, अशी भावना व्यक्त होत आहे.

Palghar Unseasonal Rain: पालघरच्या पश्चिम किनारपट्टीला वादळी वारा आणि पावसाचा तडाखा

वादळी वारा आणि पावसाचा मच्छीमारांना देखील फटका. डहाणू आणि पालघर मधील चाळीस ते पंचेचाळीस बोटींच नुकसान. वादळाच्या तडाख्यात सापडलेल्या 40-45 बोटींच मोठ नुकसान. जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे सुरू.

भारताची अंतराळ क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी - पंतप्रधान नरेंद्र मोदी

चांद्रयान मोहिमेच्या माध्यमातून अंतराळातील अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. इस्त्रोने एका मिशनमध्ये एकावेळी १०० सॅटेलाईट सोडले. प्रत्येक भारतीयाच्या उपयोगासाठी आमचे सॅटेलाईट काम करणार असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतात जल्लोष

पुण्यात देखील ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर जल्लोष

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराबाहेर भाजपकडून जल्लोषाला सुरुवात

हातात तिरंगा आणि भारतीय जवानांचे फोटो घेऊन भाजप कार्यकर्त्यांच्या गणपती बाप्पाच्या घोषणा

भाजप कार्यकर्त्यांकडून दगडूशेठ गणपतीची आरती

भाजप कार्यकर्त्यांची मंदिरात मोठी गर्दी

भारत माता की जयच्या घोषणा

Terror Attack: जम्मूतल्या पूछमध्ये पाकिस्तानचा हल्ला

38 सी आर पी एफ कॅम्पसमध्ये बॉम्ब हल्ला

भारतीय सैनिक जखमी

Beed News: संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौथी सुनावणी बीडच्या विशेष न्यायालयात

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौथी सुनावणी बीडच्या विशेष न्यायालयामध्ये आज होत आहे

मात्र विशेष न्यायाधीश पाटोदकर रजेवर असल्यामुळे हे प्रकरण तात्पुरते न्यायाधीश शिंदे यांच्या समोर आजची सुनावणी पार पडणार आहे

या सुनावणीसाठी सरकारी वकील उज्वल निकम हजर राहणार नाहीत त्यांच्या जागी विशेष सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांचे काम पाहणार आहेत

मात्र या सुनावणीसाठी आरोपी वाल्मीक कराडचे वकील विकास खाडेकर हजर असून आरोपी विष्णू चाटे चे वकील न्यायालयात हजर आहेत

या प्रकरणाची पुढील तारीख काही वेळात न्यायालय देऊ शकते.

Kalyan: कल्याण रेल्वे पोलिसांकडून कल्याण रेल्वे स्टेशनवर रूट मार्च

22 एप्रिल रोजी दहशतवाद्यानी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारत-पाक संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता.

आज भारताने पीओकेमध्ये एअर स्ट्राईक करत प्रत्युत्तर दिले .

देशातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्यात .

महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा वाढवण्यात आली आहे .

या पार्श्वभूमीवर कल्याण रेल्वे पोलिसांनी कल्याण रेल्वे स्टेशनवर आज रूट मार्च केला .

भारतीय सैन्याची ताकद, गनिमी कावा आणि देशासाठी सर्व स्तरांवरची एकता म्हणजेच ‘ऑपरेशन सिंदूर’.! सुनेत्रा पवारांच ट्विट

दहशतवाद्यांना मध्यरात्री सूर्योदय दाखवून झोप उडवणारं ठोस प्रत्युत्तर भारतानं या मोहिमेद्वारे दिलं आहे.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात ज्या महिलांनी आपल्या पतींना गमावलं, त्यांच्या दुःखाचा विचार करत, भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून दहशतवाद्यांविरुद्ध कठोर कारवाई केली. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे नऊ तळ या ऑपरेशनमध्ये उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. या माध्यमातून भारतीय थलसेना, वायुसेना आणि नौसेनेने आपली ताकद सिद्ध करत जगाला भारताच्या सैन्याच्या ताकदीची प्रचीती दिली आहे.

या यशस्वी मोहिमेत सहभागी सर्व जवानांचे मन:पूर्वक आभार. भारतीय सैन्यावर देशवासियांचा दृढ विश्वास आहे आणि तो कायम राहील, हे या कारवाईने पुन्हा सिद्ध झालं आहे.

सीमेपलीकडे जाऊन निर्णायक लष्करी कारवाई करण्यासाठी भारतीय सैन्याला संपूर्ण स्वातंत्र्य आणि ताकद देणारे देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी, गृहमंत्री मा. श्री. अमित शहा आणि संरक्षणमंत्री मा. श्री. राजनाथ सिंह जी यांचे मनःपूर्वक आभार. त्यांच्या कणखर आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळेच भारताने दहशतवादाला ठोस प्रत्युत्तर देण्यात यश मिळवले आहे.

जय हिंद! वंदे मातरम्!

Operation Sindoor: भारताने पाकड्यांची औकात दाखवली; एअर स्ट्राईक करत पहलगामचा बदला घेतला

भारताच्या सैन्याने ऑपरेशन सिंदूर सक्सेसफुल करून दाखवत पकड्यानं त्यांची औकात दाखवली आहे.

भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमाने पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. अखेर भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे.

याबाबत भारतीय सरकारने निवेदन जारी करत माहिती दिली आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य करण्यात आलं आहे.

भारतीय सैन्याने केलेल्या यशस्वी हल्ल्याचा आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरातील चिखली मध्ये आनंद उत्सव साजरा करण्यात आला

पाकिस्तानवरील सर्जिकल स्ट्राईकचा सांगलीत जल्लोष, शिव प्रतिष्ठानकडून आतिषबाजी आणि पेढे वाटून आनंदोत्सव

भारताने राकेश नावावर गेलेल्या ऑपरेशन सिंदूरचा सांगलीत जल्लोष करण्यात आला आहे.

पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताकडून पाकिस्तान काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या हल्ल्यावर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून सर्जिकल स्ट्राइक करण्यात आला आहे.

या ऑपरेशन सिंदूरचा सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान कडून जल्लोषात स्वागत करण्यात आला आहे.

शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जयघोष करत फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटून शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले आहे.

Uran: उरण शहरांमध्ये आज चार वाजता मॉक ड्रिल होणार आहे

उरण मध्ये आठ ठिकाणी सायरन बसवलेले आहेत

सायरन हे दोन मिनिटं वाजवले जाणार आहे

तसेच रात्री आठ वाजता दहा मिनिटांसाठी लाईट बंद केली जाणार आहे

सायरन वाजून नागरिकांसाठी सूचना दिल्या जाणार आहेत आपली सुरक्षा कशी राखायची यासंदर्भामध्ये सायरन च्या माध्यमातून सूचना केला जाणार आहेत

Pune Mock Drill: पुणे जिल्ह्यात मॉक ड्रील बाबतची बैठक संपली

सहा ठिकाणी होणार मॉक ड्रील होणार

विधान भवन मुळशी तहसील कार्यालय,तळेगाव,पी एम सी इमारत,पी सी एम सी इमारत,वणाज कंपनी या सहा ठिकाणी होणार मॉक ड्रील

दुपारी 4 वाजता होणार मॉक ड्रील

Air Strike च्या हल्ल्यानंतर परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांची पत्रकार परिषद

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणतात, "दहशतवादी कारवायांवर लक्ष ठेवणाऱ्या आमच्या गुप्तचर संस्थांनी असे संकेत दिले आहेत की भारतावर आणखी हल्ले होऊ शकतात आणि ते थांबवणे आणि त्यांचा सामना करणे आवश्यक वाटले."

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेवुन केली अभिषेक पुजा

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेवुन अभिषेक पुजा केली.

दरम्यान तुळजाभवानी माता ही आमची कुलस्वामिनी असुन गेली अनेक वर्षापासून मी येत असतो, दरम्यान महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी जी मला संधी मिळाली आहे

ती सेवा करताना तुळजाभवानी मातेने मला शक्ती व बळ द्यावे अशी प्रार्थना केल्याचे कदम यांनी सांगितले यावेळी मंदीर संस्थानचे वतीने योगेश कदम यांचा तुळजाभवानी मातेचे प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.

Operation Sindoor: भारताचे माजी लष्कर प्रमुख यांचे सूचक ट्विट

भारत आणखी एक ऑपरेशन राबवणार?

ऑपरेशन सिंदूर नंतर भारतीय लष्कर दलाचे आणखी एक ऑपरेशन?

भारताचे माजी लष्कर प्रमुख यांचे सूचक ट्विट

"Abhi picture baki hai…" भारताचे माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांचे ट्विट?

लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे भारतीय लष्कराचे २८ वे प्रमुख होते

३१ डिसेंबर २०१९ रोजी लष्कर प्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारला होता

त्यापूर्वी नरवणे यांच्याकडे पूर्व मुख्यालयाची जबाबदारी होती

Akola: भारताचा दहशतवाद्यांवर हल्ला, अकोल्यात फटाके फोडत जल्लोष

भारताने मध्यरात्रीनंतर पाकव्याप्त भागातील दहशतवाद्यांचे तळ जोरदार हल्ले करून उद्ध्वस्त केले.

यातं 75 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे बोलल्या जातंय.. पहलगाम हल्ल्याचा बदला घेत तब्बल नऊ ठिकाणांवर हवाई हल्ले करण्यात आलेय..

दहशतवाद्यांवर भारताने केलेल्या हल्ल्यानंतर आता देशभरात जल्लोष साजरा होत आहे.. अकोल्यातही अकोलेकरांनी जल्लोष केलाय..

अकोल्यातल्या अग्रेसन चौकात चौकातील विश्व हिंदू परिषद आणि अकोलेकरांनी फटाके फोडत जल्लोष केला आहे..

आणि भारताने केलेल्या हल्ल्याचा गर्व असल्याचे अकोलेकरांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या..

जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांकडून तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक

जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सीमा/नियंत्रण रेषेवरील सुरक्षा आणि तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. मुख्यमंत्री कार्यालय म्हणतात, "नागरिकांचे जीवन सुरक्षित करणे, पायाभूत सुविधा मजबूत करणे आणि कोणत्याही उदयोन्मुख आव्हानांना त्वरित प्रतिसाद देणे सुनिश्चित करणे यावर भर देण्यात आला आहे."

Air Strike च्या हल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले...

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, "मी पंतप्रधान मोदी आणि आपल्या सशस्त्र दलांचे आभार मानतो ज्यांनी उत्तम काम केले आहे... त्यांनी दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानला योग्य उत्तर दिले आहे. पण मला वाटते की हा एक ट्रेलर आहे आणि चित्रपट अजून येणे बाकी आहे. मी याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानतो, कारण त्यांच्या नेतृत्वाखाली हे ऑपरेशन सिंदूर झाले आहे आणि ज्या माता आणि बहिणींचे "सिंदूर" हिसकावून घेण्यात आले होते त्यांचा बदला घेतला आहे... जगभरातील देश त्याचे समर्थन करत आहेत... ही फक्त सुरुवात आहे. पाकिस्तान भारतासमोर कुठेही टिकत नाही आणि जर त्याने काही केले तर आपले सशस्त्र दल जगाच्या नकाशावरून पाकिस्तानला मिटवून टाकतील."

अजित पवारपाकिस्तान, पाकव्याप्त काश्मिरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करुन ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी केल्याबद्दल भारतीय सैन्यदलांचे अभिनंदन शरद पवारया मोहिमेला नाव जे दिलं ते योग्य दिलं गेलं. Palghar Rain: सलग दुसऱ्या दिवशी पालघर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची दमदार हजेरी

वादळी वाऱ्यामुळे पालघरच्या ग्रामीण भागातील अनेक घरांच नुकसान.

तर भात शेती आणि वीट उत्पादक व्यावसायिकांना देखील पावसाचा मोठा फटका.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात दमदार पाऊस सुरू. तर पूर्व भागात पावसाची रिपरिप कायम.

Buldhana: भारताने केलेल्या एअर स्ट्राईकचं स्वागत करत अभिमानाने बुलढाण्यात नागरिक मोठा जल्लोष

पहेलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर हेअर स्ट्राइक करून पैलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शहिदांचा बदला घेतल्याची भावना व्यक्त करत बुलढाण्यातील नागरिक रस्त्यावर उतरले असून या ठिकाणी पहेलगाम हल्ल्यातील मृत्युमुखी नागरिकांना प्रथम श्रद्धांजली वाहण्यात आली व त्यानंतर भारताने केलेल्या एअर स्ट्राइक च स्वागत करत अभिमानाने बुलढाण्यात नागरिक मोठा जल्लोष केल्या जात आहे...

Operation Sindoor: राजस्थानमधील स्थानिकांमध्ये 'हिंदुस्तान झिंदाबाद' आणि 'भारत माता की जय' च्या घोषणा

राजस्थानमधील स्थानिकांनी 'हिंदुस्तान झिंदाबाद' आणि 'भारत माता की जय' च्या घोषणा दिल्या आणि आनंद साजरा केला.

Rahul Gandhi: ऑपरेशन सिंदूर सुरू केल्याबद्दल राहुल गांधींकडून भारतीय सैन्याचे कौतुक Mock Drill: पुण्यात आज होणाऱ्या मॉक ड्रीलच्या नियोजनासाठी यंत्रणांची बैठक

सकाळी १० वाजता पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे नियोजन

पुणे जिल्ह्यात आज तीन ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे

पुणे विधानभवन, मुळशी पंचायत समिती आणि तळेगाव नगर परिषद या ठिकाणी होणार ड्रिल

पोलिस, अग्निशमन दल, एन डी आर एफ, सैन्य दल या यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार

Eknath Shinde: ऑपरेशन सिंदूरबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, "ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केल्या जाणाऱ्या कारवाईचे मी स्वागत करतो. त्याबद्दल मी पंतप्रधान मोदींचे आभार मानतो. काश्मीरच्या पहलगाममध्ये निष्पाप लोकांना त्यांच्या कुटुंबियांसमोर मारण्यात आले... न्याय मिळाला आहे. मी पंतप्रधान मोदींचे आभार मानतो आणि ते पाकिस्तानला सोडणार नाहीत."

Operation Sindoor: पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर

पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर भारतीय सशस्त्र दलांनी केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर नागपूरमधील लोकांनी देशाचे कौतुक केले.

Akola Unseasonal Rain: अकोल्यात काल सायंकाळी आणि रात्री अवकाळी पावसासह गारपिट

अकोल्यात काल सायंकाळी आणि रात्री अवकाळी पावसासह गारपिट झालीय.. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, अकोट, बाळापूर, अकोला, आणि काहीशी पातूर तालुक्याला अवकाळीने झोडपून काढलंय.. जोराच्या वादळी वारासह विजेचा कडकडाट देखील सुरु होता..

अकोल्यातल्या तेल्हारा आणि बाळापूर तालुक्यात गारपिट झाली आहे.. बाळापुर तालुक्यात निंबू, आंबा, कापणी करून ठेवलेला कांदासह अन्य फळबागांचं मोठं नुकसान झाले आहे..

दरम्यान, वादळी वाऱ्यामूळ अनेक ठिकाणी मोठमोठे झाड अक्षरशः उन्मळून पडले आहे.. अनेक गावांमध्ये काल रात्रीपासून विद्युत पुरवठा खंडित आहे.

Supriya Sule: जय हिंद, खासदार सुप्रिया सुळे यांनी केले सोशल मिडिया पोस्ट

जय हिंद, खासदार सुप्रिया सुळे यांनी केले सोशल मिडिया पोस्ट

ऑपरेशन सिंदूर नंतर विरोधकांकडून देखील कौतुक

जय हिंद, आम्ही भारतीय जवानांसोबत उभे आहोत अशा आशयाची सुप्रिया सुळे यांची पोस्ट

Operation Sindoor: दहशतवाद्यांच्या क्रूर हल्ल्याचं भारताने चोख प्रतिउत्तर दिलं

भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केल्यानंतर डोंबिवलीकरांनी समाधान व्यक्त केले तर विद्यार्थ्यांनी देखील बद्दल भारतात सरकारचे अभिनंदन केलं..

एअर स्ट्राईकच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याचा विद्यार्थ्यांनी सांगितलं दहशतवाद्यांच्या क्रूर हल्ल्याचे हेच प्रत्युत्तर असल्याचे देखील विद्यार्थ्यांनी सांगितलं

भारताने अशाच कठोर कारवाया करून दहशतवादाच्या नांग्या ठेचल्या पाहिजेत असला पाहिजेत अशी देखील मागणी या विद्यार्थ्यांनी केली

भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याबद्दल उल्हासनगर मधील नागरिकांच्या प्रतिक्रिया

पहलगाव मध्ये दहशतवाद्यांनी 28 निरापराध भारतीयांना मारल्यानंतर, आज पाकिस्तान मधील नऊ दहशतवादी ठिकाणी भारताने क्षेपणास्त्र हल्ला करून दहशतवादी ठिकाणांना नष्ट केलं याबद्दल भारतात जल्लोष व्यक्त केला जात आहे तसेच येथील नागरिकांच्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत,

Operation Sindoor: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात औस्तुभ गणबोटे यांचा मृत्यू झाला, त्यांच्या पत्नीची प्रतिक्रिया म्हणाले...

पुण्यात, त्यांच्या पत्नी संगीता गणबोटे म्हणाले, "लष्कराने केलेली कारवाई चांगली आहे आणि त्याला ऑपरेशन सिंदूर असे नाव देऊन त्यांनी महिलांचा आदर केला आहे.

मी अजूनही काही दिवस रडते.

आम्ही पंतप्रधान मोदी अशी कारवाई करतील याची वाट पाहत होतो आणि त्यांनी त्यांना योग्य उत्तर दिले आहे.

दहशतवाद्यांचा खात्मा केला पाहिजे..."

Operation Sindoor: केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आज दिल्लीत होणार

'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये एअर स्ट्राईक केला.

या कारवाईनंतर दिल्लीत महत्त्वाच्या दोन बैठकांचा कार्यक्रम ठरला आहे.

सकाळी ११ वाजता कॅबिनेट सुरक्षा समितीची आणि नंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या ऑपरेशनवर लक्ष ठेवून आहेत.

Raigad Unseasonal Rain: रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

रायगड जिल्ह्याच्या बहुतांश भागात रात्री उशिरा अवकाळी पावसाने हजेरी लावली.

दक्षिण रायगडच्या माणगाव, गोरेगाव, महाड, श्रीवर्धन, पोलादपूर तालुक्यात मध्यम तर अलिबाग, पेण, मुरूड, खोपोली भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला असला तरी जोरदार वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता.

अखेरच्या टप्प्यातील आंबा पिकाचं या पावसाने नुकसान होण्याची शक्यता आहे. काल सकाळ पासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते.

दरम्यान पुढील 24 तासात जिल्ह्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस बरसण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय.

वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची जोरदार हजेरी अनेक ठिकाणाचे विद्युत पोल पडले, रात्री शहापूर तालुक्यातील विज पुरवठा खंडित

रात्री अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शहापूर तालुक्यातील लोकांची तारांबळ उडाली विजेच्या गडगडाट सह वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने तालुक्यातील अनेक भागातील विद्युत पोल पडल्याने शहापूर तालुक्यातील विजपुरवठा खंडीत झाला आहे. तर उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला थोड्या प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक भागात झाडे रस्त्यावर पडली तर झाडे वाहनांवर पडल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

Yavatmal: पंचायतराज अभियान्यातून 16 पंचायत समित्या बाद

यवतमाळ जिल्ह्याची मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषद आणि तालुकास्तरावरील 16 समित्या ग्राम विभागाच्या यशवंतराव चव्हाण पंचायतराज अभियानात फेल ठरल्या असून जिल्हा परिषदेसह 16 पैकी एकाही पंचायत समितीला प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त करता आला नाही, त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थेची कामगिरी चर्चेत आली आहे.

Dhule: आग्रा रोड परिसरामध्ये रात्री तीन ते चार दुकानांना अचानक लागली आग

धुळे शहरातील आग्रा रोड परिसरामध्ये रात्री तीन ते चार दुकानांना अचानक आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे,

यामध्ये प्रामुख्याने बॅगच्या दुकानाला शॉक सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे,

आणि या दुकानात लागलेल्या आगिने रौद्ररूप धारण केल्यामुळे बाजूच्या तीन ते चार दुकानांना देखील या आगीने आपल्या लपेट्यात घेतले आहे, यामध्ये दुकानातील मोठ्या प्रमाणात सामान जळून खाक झाले असल्यामुळे लाखोंचे नुकसान या आगीच्या घटनेमध्ये झाले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे, अग्निशमन विभागाच्या जवानांनी अथक प्रयत्न केल्यानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे,

Opration Sindoor: भारताने रात्री दीड वाजता केला एअर स्ट्राईक

पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांचा धर्म विचारून त्यांच्यावर गोळीबार केला होता.

या हल्ल्याच्या १५ दिवसांत भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले.

६ आणि ७ मेच्या रात्री, पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर टार्गेट केलेली कारवाई करण्यात आली, जिथे दहशतवादी लपून बसले होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.