बुधवारी सकाळी दहशतवादी घटना रोखण्यासाठी भारताने कारवाई केली. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी "Operation Sindoor" संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी "Operation Sindoor" संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, ही कारवाई भारताच्या सुरक्षेचा भाग असून देशाच्या रक्षणासाठी आवश्यक होती.
विक्रम मिस्री यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1964 रोजी श्रीनगर, जम्मू आणि काश्मीर येथे झाला. त्यांनी हिंदू कॉलेज, दिल्ली विद्यापीठातून इतिहास विषयात पदवी प्राप्त केली आणि नंतर एक्सएलआरआय, जमशेदपूर येथून एमबीए पूर्ण केले.
1989 मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी म्हणून नियुक्ती त्यानंतर ब्रुसेल्स, ट्युनिस, इस्लामाबाद, वॉशिंग्टन डी.सी., म्युनिक आणि कोलंबो येथील भारतीय मिशनमध्ये सेवा.
स्पेन (2014), म्यानमार (2016) आणि चीन (2019-2021) येथे भारताचे राजदूत म्हणून कार्यभार.
इंदर कुमार गुजराल (1997), मनमोहन सिंग (2012) आणि नरेंद्र मोदी (2014) यांचे खाजगी सचिव म्हणून काम केले आहे.
1 जानेवारी 2022 ते 30 जून 2024 दरम्यान उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (Deputy NSA) म्हणून कार्यरत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासोबत परराष्ट्र धोरणावर काम.