टायर कंपनी देणार प्रत्येक शेअरला २२९ रुपये लाभांश, चौथ्या तिमाहीत नफ्यात ३१% वाढ
ET Marathi May 08, 2025 01:45 PM
मुंबई : जानेवारी-मार्च २०२५ या तिमाहीत टायर कंपनी एमआरएफ लिमिटेडचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर २९ टक्क्यांनी वाढून ५१२.११ कोटी रुपयांवर पोहोचला. एक वर्षापूर्वी नफा ३९६.११ कोटी रुपये होता. कंपनीच्या कामकाजातून मिळणारा एकत्रित महसूल ११.४ टक्क्यांनी वाढून ७०७४.८२ कोटी रुपये झाला. एक वर्षापूर्वी हा आकडा ६३४९.३६ कोटी रुपये होता. मार्च २०२४ च्या तिमाहीत ५९१५.८३ कोटी रुपयांवरून खर्च वाढून ६५२६.८७ कोटी रुपये झाला. अंतिम लाभांश एमआरएफ लिमिटेडच्या संचालक मंडळाने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर २२९ रुपये अंतिम लाभांश देण्याची शिफारस केली आहे. एमआरएफने आर्थिक वर्ष २०२५ साठी प्रति शेअर ३ रुपये असे २ अंतरिम लाभांश आधीच वितरित केले आहेत. अंतिम लाभांशासह २०२५ च्या आर्थिक वर्षासाठी कंपनीने दिलेला एकूण लाभांश प्रति शेअर २३५ रुपये असेल. २०२४ च्या आर्थिक वर्षात, कंपनीने प्रति शेअर १९४ रुपये अंतिम लाभांश आणि दोन हप्त्यांमध्ये प्रति शेअर ३ रुपये अंतरिम लाभांश दिला होता. आर्थिक वर्षातील नफा२०२४-२५ या संपूर्ण आर्थिक वर्षात एमआरएफचा निव्वळ नफा १८६९.२९ कोटी रुपये राहिला आहे, गेल्या वर्षीच्या २०८१.२३ कोटी रुपयांपेक्षा हा नफा कमी आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये २५१६९.२१ कोटी रुपयांवरून कामकाजातून मिळणारा महसूल २८१५३.१८ कोटी रुपयांवर पोहोचला. शेअर्स वाढलेबीएसईवर एमआरएफचे शेअर्स ७ मे रोजी ५ टक्क्यांनी वाढले आणि किंमत १४१५०५ रुपयांवर गेली. व्यवहार बंद होताना शेअर ४ टक्क्यांनी वाढून १४०४२८.७० रुपयांवर बंद झाला. कंपनीचे मार्केट कॅप ५९५०० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. फक्त एका महिन्यात शेअरची किंमत २७ टक्क्यांनी वाढली आहे. मार्च २०२५ अखेर कंपनीत प्रवर्तकांचा २७.७८ टक्के हिस्सा होता.
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.