भारताच्या भितीने Pakistan Share Market मध्ये हाहाकार; लोअर सर्किटमुळे व्यवहार बंद करण्याची आली वेळ
ET Marathi May 08, 2025 11:45 PM
KSE 30 Huge Crashed : भयावह घसरणीमुळे आणि गुंतवणुकदारांमधील भितीमुळे Pakistan Share Market मध्ये हाहाकार पाहायला मिळत आहे. पाकिस्तानचा प्रमुख निर्देशांक KSE तब्बल ७.२% घसरला. त्यानंतर नियमकांना थेट बाजारातील व्यवहार बंद करावे लागले.दरम्यान, भारतीय शेअर बाजार मात्र स्थिर आहेत, शेजारील देशाशी वाढता तणाव असूनही सेन्सेक्स आणि निफ्टी बेंचमार्क निर्देशांक स्थिर व्यवहार करीत आहेत. पाकिस्तानचा बेंचमार्क निर्देशांक केएसई-३० ७.२% घसरल्यानंतर पाकिस्तानने शेअर बाजारातील व्यवहार थांबवले आहेत. भारतीय लष्कराने 'Operation Sindoor' अंतर्गत पाकिस्तानातील अनेक दहशतवादी संघटनांवर हल्ला केल्यानंतर सलग दुसऱ्या व्यापारी सत्रात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. दुपारी १ वाजता केएसई १०० निर्देशांक देखील ५ टक्क्यांहून अधिक (जवळपास ६,००० अंकांनी) घसरून १०४,०८७ च्या आसपास राहिला. दुपारी १ वाजता केएसई १०० निर्देशांक देखील ५ टक्क्यांहून अधिक (जवळपास ६,००० अंकांनी) घसरून १०४,०८७ च्या आसपास ट्रेड करीत होता. पाकिस्तानी बाजारातील गुंतवणूकदार उद्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) देशासाठी त्यांच्या निधी सुविधेच्या संभाव्य विस्ताराबाबतच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. २२ एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केएसई १०० निर्देशांक आतापर्यंत १३ टक्क्यांनी घसरला आहे तर केएसई ३० निर्देशांक आतापर्यंत १४.३ टक्क्यांनी घसरला आहे. सध्या सुरू असलेल्या भारत - पाकिस्तान तणावाआधी सॉवेरेन क्रेडिट रेटिंग अपग्रेड आणि जागतिक तेलाच्या किमतींमध्ये घट झाल्यामुळे पाकिस्तान शेअर बाजारात रिकव्हरी येत होती. गेल्या वर्षी, पाकिस्तानच्या शेअर बाजाराने २२ वर्षांतील सर्वाधिक परतावा दिला, ज्यामुळे जागतिक गुंतवणूकदारांकडून पुन्हा रस निर्माण झाला. ब्लॅकरॉक आणि ईटन व्हान्स सारख्या मालमत्ता व्यवस्थापन दिग्गजांनी पाकिस्तानच्या ५० अब्ज डॉलर्सच्या इक्विटी मार्केटमध्ये त्यांचे एक्सपोजर वाढवले आहे. ज्यांनी गेल्या वर्षी प्रभावी ८४ टक्के परतावा दिला आहे.ब्लूमबर्गच्या मते, पाकिस्तानच्या स्टॉक आणि डॉलर बाँड्सना गेल्या दोन वर्षांतील सर्वात वाईट आर्थिक स्थितीचा सामना करीत आहे. देश सध्या २०२३ मध्ये दिवाळखोरीच्या जवळ आणणाऱ्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे.
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.