पाकिस्तानने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या अयशस्वी प्रयत्नांना भारताने योग्य उत्तर दिले आहे. यानंतर आता भारताने पाकिस्तानच्या लोहार आणि सियालकोटवर ड्रोन हल्ला केला आहे. भारताने लाहोरमधील AWACS हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केली आहे. यापूर्वी, पाकिस्तानने जम्मू, राजस्थान आणि पंजाबमधील अनेक भागात ड्रोन हल्ले करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता, ज्याला भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने योग्य उत्तर दिले.
भारताने त्यांच्या काउंटर ड्रोन सिस्टीम, S-400 वापरून पाकिस्तानची सर्व क्षेपणास्त्रे पाडली. एवढेच नाही तर भारताने पाकिस्तानची अनेक लढाऊ विमाने पाडली आहेत. भारताने पाकिस्तानचे २ जेएफ १७ आणि एक एफ-१६ विमान पाडले आहे. हे पाकिस्तानी लढाऊ विमान भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होते, जे भारताने पाडले आहेत.
भारताच्या प्रत्युत्तर हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण आहे. लाहोर, इस्लामाबाद, कराची आणि बहावलपूरमध्ये वाजत आहेत. भारतीय लष्कराने पाकिस्तानविरुद्ध केलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईदरम्यान, भारतीय नौदल देखील सक्रिय झाले आहे. भारतीय नौदलाचे पश्चिम कमांड पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी सामील होण्याची योजना आखत आहे. भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानची सर्वात अद्ययावत एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टम (AWACS) नष्ट झाली आहे.
सध्या जम्मूमध्ये वीजपुरवठा पूर्ववत झाला आहे. त्याच वेळी, राजस्थान, पंजाब तसेच जम्मू आणि काश्मीरमधील अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला. भारताच्या पाकिस्तानविरुद्धच्या प्रत्युत्तर कारवाईदरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सीडीएस आणि तिन्ही सैन्याच्या प्रमुखांशी सतत संपर्कात आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली.
दरम्यान अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी एस जयशंकर यांच्याशी चर्चा केली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने म्हटले आहे की, मार्को रुबियो यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री सुब्रह्मण्यम जयशंकर यांच्याशी चर्चा केली. त्यांनी तणाव त्वरित कमी करण्याची गरज व्यक्त केली. राजस्थान भागात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तानने ड्रोन वापरून जम्मू विमानतळ आणि रेल्वे स्थानकावर क्षेपणास्त्र हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्नही केला. त्याच वेळी, राजौरीमध्ये आत्मघातकी हल्ल्याचे प्रयत्न उधळून लावण्यात आले.