Pakistan Attack : भारतानं पाकिस्तानचं F16, JF 17 विमानं पाडली! S400 सिस्टिमचं मोठी कामगिरी
esakal May 09, 2025 03:45 AM

Pakistan Attack : पाकिस्ताननं जम्मू आणि पंजाबमधील अनेक ठिकाणी हल्ले केल्यानंतर भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने अर्थात S400 सिस्टिमनं पाकिस्तानचं एफ-१६ विमान पाडल्याचं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या उधमपूर आणि राजस्थानच्या जैसलमेरमध्येही ड्रोन हल्ले उधळण्यात आले आहेत आणि अखनूरमध्ये एक ड्रोन पाडण्यात आला आहे. पूंछमध्ये दोन कामिकाझे ड्रोनही पाडण्यात आले आहेत.

पाकिस्ताननं सीमाभागात पाकिस्ताननं एकाच वेळी विमानतळासह जम्मूमधील अनेक ठिकाणी हल्ले केले. गुरुवारी रात्री आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडून जम्मूवर रॉकेट डागण्यात आले. त्यांपैकी एक ड्रोन जम्मूच्या नागरी विमानतळावर आदळला, ज्यामुळं लढाऊ विमानांना प्रत्युत्तर देण्यात आलं. भारतानं आपली हवाई संरक्षण प्रणाली सक्रिय केली, ज्यानं येणारे रॉकेट यशस्वीरित्या थांबवले.

जम्मू विमानतळ, सांबा, आरएस पुरा, अर्निया आणि जवळच्या भागात एस-४०० हवाई संरक्षण यंत्रणेने आठ पाकिस्तानी क्षेपणास्त्रे पाडली. जम्मू विद्यापीठाजवळ दोन पाकिस्तानी ड्रोन पाडण्यात आले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.