Pakistan Attack: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यानंतर आता भारताची विमानवाहून नौका असलेल्या INS विक्रांतनं अरबी समुद्रातून पाकिस्तानवर क्षेपणास्त्र डागण्यात आलं आहे. हा आत्ताचा सर्वात मोठा हल्ला ठरला आहे. यामुळं भारताची थ्री डायमेन्शनल फोर्स अर्थात हवाई दल, लष्कर आणि नौदल हे तिन्ही अॅक्टिव्ह झाले आहेत.
INS विक्रांतवरुन पाकिस्तानच्या कराची बंदरात दहा स्फोट घडवून आणल्याची माहिती मिळते आहे. त्याचबरोबर पाकिस्तानच्या ओरमारा बंदरावरही मोठे हल्ले घडवून आणले आहेत. त्यामुळं भारतानं आता रावळपिंडी, पेशावर आणि इस्लामाबाद इथं ड्रोन हल्ले भारतानं घडवून आणले आहेत.