Operation Sindoor Update : भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे. मंगळवारी रात्री अवघ्या 25 मिनिटांमध्ये भारताने पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून दहशतवाद्यांची अड्डे नष्ट केल्या. या कारवाईतून पाकिस्तान सावरताना दिसत नाही. तोच लाहोर विमानतळावर तीन मोठे स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.
लाहोरमधील वाॅल्टन झालेल्या स्फोटाचा आवाज येवढा मोठा होता की अजुबाजुच्या गोपालनगर आणि नसराबाद भागात आवाज ऐकु आल्याचे सांगितले जाते आहे. स्फोटानंतर पाकिस्तानच्या अग्निशमन दलाकाडून मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले की एकामागून एक तीन स्फोट झाले त्यामुळे मोठा गोंधळ उडाला.
स्फोट नव्हे मिसाईलने हल्लालहारौमध्ये झालेल्या स्फोटानंतर प्रत्यक्षदर्शीने सांगितेली एअरपोर्टवर मिसाईलने हल्ला करण्यात आला. हल्ल्यानंतर एअरपोर्टवर सायरनचा आवाज ऐकायला आला. त्यानंतर हा आवाज लगेच बंद करण्यात आला. त्यामुळे काय झाले ते समजले नाही तसेच विमानतळ देखील बंद करण्यात आले.
पाकिस्तान लष्कराकडून स्फोट?लाहौरमध्ये झालेल्या स्फोटाबद्दल एका हिंदी चॅनलने सुत्रांच्या हवाल्याने सांगितले आहे की, लाहौरमध्ये लष्कर सराव करत होते. या सरावाच्या दरम्यान लाहौर एअरपोर्ट जवळ स्फोट झाला. चुकून पाकिस्तानी लष्कराने आपल्याच शहरात स्फोट केला.
स्थानिक घाबरलेभारताने एअर स्ट्राईक करून पाकिस्तानच्या 9 ठिकाणांवर हल्ला केला. या हल्ल्यामुळे पाकिस्तानामध्ये आधीच घबराट पसरली आहे. त्यात लाहौरमध्ये झालेल्या स्फोटाने लाहौरमधील नागरिक अधिक घाबरल्याची माहिती आहे. भारतीय लष्कराकडून ही कारवाई केल्याची शंका काही जण उपस्थित करत होते. मात्र, भारतीय लष्कराकडून अधिकृतरित्या याबाबत काही सांगण्यात आलेले नाही.