Solapur: 'घटस्फोट दे म्हणून दोघांच्या मदतीने पतीला मारहाण'; तिघांविरूद्ध गुन्हा दाखल..
esakal May 09, 2025 07:45 PM

सोलापूर : ‘तू घटस्फोट दे नाहीतर तुला आम्ही सोडणार नाही’ असे म्हणून पत्नी पूनम हिने दोघांच्या मदतीने मारहाण केल्याची फिर्याद प्रताप गोरख राऊत (रा. चौंडेश्वरवाडी, ता. माळशिरस) या तरुणाने करमाळा पोलिसांत दिली.

सात मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास भाळवणी येथील एसटी स्टॅण्डवर थांबलो होतो. त्यावेळी पत्नी पूनम व तिच्या कुटुंबातील लक्ष्मण काशिनाथ शिंदे व अनिकेत लक्ष्मण शिंदे (रा. राजुरी, ता. करमाळा) हे तिघेजण तेथे आले. त्यांनी जवळ येऊन सुरुवातीला शिवीगाळ, दमदाटी केली.

आमच्या मुलीला घटस्फोट दे अशी त्यांनी मागणी केली. त्यांना समजावून सांगत असताना पत्नीसह तिघांनी काठीने डोक्यात व डाव्या हातावर लाकडी काठीने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, असेही फिर्यादीत नमूद आहे. यात तिघांविरूद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिस नाईक गवळी तपास करीत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.