सध्याच्या काळात प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात इतकी व्यस्त झाली आहे की तिच्याकडे सर्व कामं करण्यासाठी वेळ आहे पण स्वतःसाठी वेळ नाही. हेच कारण आहे की अनेक जण त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि नंतर पश्चात्ताप करत बसतात. अशा परिस्थितीत, शरीर लहान वयातच अनेक आजारांना बळी पडते. अनेक लोकांवर कामाचा इतका ताण असतो की ते नैराश्य आणि चिंतेचे बळी बनतात. या सगळ्याला तोंड देण्याचे अनेक मार्ग आहेत, यापैकीच महत्त्वाचे मार्ग म्हणजे ध्यान करणे किंवा फिरायला जाणे. काही व्यायाम देखील आहेत जे तुमचा ताण कमी करण्यासाठी मदत करू शकतात.
मॉर्निंग वॉक करणे शरीरासाठी फायदेशीर असल्याचे कायम म्हटले जाते परंतु तुम्ही अशा काही जणांपैकी एक असाल ज्यांना सकाळी लवकर उठण्यासाठी वेळ मिळत नाही किंवा ऑफिसच्या कामामुळे वेळ मिळत नाही, तर सनसेट वॉक तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. त्याचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊया.
जेव्हा तुम्ही सूर्यास्ताच्या वेळी फिरायला जाता तेव्हा त्याला सनसेट वॉक म्हणतात. यामध्ये तुम्ही संध्याकाळच्या सुंदर दृश्यांचा आनंद घेत फिरू शकता, यामुळे तुमचा संपूर्ण दिवसाचा ताण कमी होईल आणि तुम्हाला बरे वाटेल. निसर्गाशी जवळीक साधण्यासाठी आणि तुमचा वाईट मूड सुधारण्यासाठी हा काळ सर्वोत्तम आहे. म्हणून, शक्य असल्यास, सकाळी आणि संध्याकाळी फिरायला जावे.
तुमचा मूड रिफ्रेश करते
दिवसभराच्या धावपळीनंतर आणि जबाबदाऱ्यांनंतर, तुम्ही निसर्गाच्या जवळ जाऊन तुमच्या दिवसाचा सर्व ताण कमी करू शकता. सूर्यास्ताच्या वेळी फिरायला जाण्याने तुमच्या मनाला शांती मिळते. सूर्यास्ताच्या वेळी आकाशाचे सुंदर दृश्य, थंड वारा आणि चालताना दिसणारा नयनरम्य प्रकाश यामुळे तुमचा वाईट मूड देखील सुधारू शकतो.
झोप सुधारते
सूर्यास्ताच्या वेळी फिरायला जाण्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल ज्यामुळे तुम्हाला ताण जाणवणार नाही आणि यामुळेच जर मन शांत असेल तर तुमची झोपही चांगली होईल.
पचन चांगले होते
रात्रीच्या जेवणापूर्वी थोडे फिरायला गेल्याने पचनसंस्था निरोगी राहते. म्हणूनच संध्याकाळी जेवणानंतर फिरायला जाण्याचा सल्ला दिला जातो. संध्याकाळी जेवणापूर्वी तुम्ही सूर्यास्ताच्या वेळी फिरायला जाऊ शकता.
ऊर्जा वाढवते
संध्याकाळच्या वेळी फिरल्याने शरीरासोबतच तुमचे मानसिक आरोग्यही चांगले राहील. फिरायला जाण्याने शरीरातील ऊर्जा वाढते, त्यामुळे तुम्हाला कोणतेही काम करण्यास आळस वाटत नाही.
सर्जनशीलता वाढवते
निसर्ग तुमचा सर्वात चांगला मित्र आहे. त्याच्या जवळ गेल्याने, तुमची सर्व नकारात्मकता नाहीशी होते आणि तुम्ही अनेक गोष्टींबद्दल चांगल्या पद्धतीने विचार करू शकता. तुमचे मन देखील जलद काम करते ज्यामुळे तुमची सर्जनशीलता वाढते.
हेही वाचा : Travelling Tips : पहिल्यांदाच परदेश प्रवास करताना घ्यायची काळजी
संपादित – तनवी गुडे