Pakistan: 'आम्हाला मदत करा...', पाकिस्तानने मागितली कर्जाची भीक, जागतिक बँकेकडेही केली विनंती
esakal May 10, 2025 02:45 AM

Pakistan Tweets Plea For International Loans: भारत पाकिस्तान तणावा दरम्यान, पाकिस्तानची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. अलिकडेच पाकिस्तान सरकारने संपूर्ण जगासमोर विनवणी केली आहे. पाकिस्तान सरकारच्या आर्थिक व्यवहार विभागानुसार, भारतीय हल्ल्यात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत, आता पाकिस्तान सरकारने जगभरातील त्यांच्या आंतरराष्ट्रीय भागीदारांकडून अधिक कर्जाची मागणी केली आहे.

खरंतर, पाकिस्तान सरकारच्या आर्थिक व्यवहार विभागाची एक पोस्ट समोर आली आहे. "शत्रूकडून झालेल्या मोठ्या नुकसानीनंतर पाकिस्तान सरकारने आंतरराष्ट्रीय भागीदारांना अधिक कर्जासाठी आवाहन केले आहे. वाढत्या युद्ध आणि घसरत्या आर्थिक परिस्थिती दरम्यान, आम्ही आंतरराष्ट्रीय भागीदारांना तणाव कमी करण्यास मदत करण्याचे आवाहन करतो.," असे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील एका पोस्टमध्ये वाचले आहे. पाकिस्तानने या पोस्टमध्ये जागतिक बँकेलाही टॅग केले आहे.

त्याचवेळी, भारत-पाकिस्तान तणावावर चीनकडून एक मोठे विधान समोर आले आहे. "सध्याच्या घडामोडींबद्दल चीन चिंतेत आहे. भारत आणि पाकिस्तान नेहमीच एकमेकांचे शेजारी आहेत आणि राहतील.

ते दोघेही चीनचे शेजारी आहेत," असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी काल सांगितले. "चीन सर्व प्रकारच्या दहशतवादाला विरोध करतो. आम्ही दोन्ही बाजूंना शांतता आणि स्थिरतता ठेवण्याचे आवाहन करतो, संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरसह आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन करण्याचे, शांतता राखण्याचे, संयम बाळगण्याचे आणि परिस्थिती आणखी गुंतागुंतीची बनवू शकतील अशा कृती करण्यापासून परावृत्त करण्याचे आवाहन करतो.," असे जियान म्हणाले.

रात्रीच्या वेळी पाकिस्तानने भारतातील अनेक शहरांना लक्ष्य केले होते. यानंतर, विविध शहरांमध्ये ब्लॅकआउट लागू करण्यात आला. सध्या राजस्थानातील जोधपूर, जैसलमेर, बिकानेर आणि गंगानगर यांसारखे सीमावर्ती जिल्हे सतर्क आहेत. भारताने त्यांचे तीन लढाऊ विमान पाडले आहेत, ज्यात दोन JF-17 आणि एक F-16 यांचा समावेश आहे आणि त्यांचा एक वैमानिकही ताब्यात घेण्यात आला आहे.

या पायलटला राजस्थानच्या लाठी येथून पकडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे गुरुवारी रात्री पाकिस्तानने जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थानवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला केला. त्याच वेळी, गुजरातमध्ये काही ड्रोन देखील दिसले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.