Maharashtra Live News Update : माउली फाट्याजवळ भीषण अपघात २ जण ठार, २ गंभीर जखमी
Saam TV May 09, 2025 08:45 PM
माउली फाट्याजवळ भीषण अपघात २ ठार, २ गंभीर ; टिप्परने मोटारसायकला चिरडले

पळशी सुपो येथून शेगावकडे येणाऱ्या मोटरसायकलला भेंडवळ जवळील माऊली फाटा येथे भरधाव जाणाऱ्या टिप्परने जोरदार धडक दिली

यामध्ये मोटरसायकल वरील दोन बालके जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

आपल्या आजी आजोबा सोबत दोन्ही नातवंड हे शेगावकडे येत होते.

अपघातानंतर संतप्त जमावाने टिप्परला आगीचे हवाली केले.

IPL 2025: आयपीएल अनिश्चित काळासाठी आजपासून स्थगित

आयपीएल अनिश्चित काळासाठी आजपासून स्थगित करण्यात आला आहे.

भारत-पाकिस्तानच्या संघर्षामुळे बीसीसीआयचा मोठा निर्णय

आयपीएलचे आणखी १६ सामने शिल्लक आहेत.

भारत-पाकिस्तानच्या तणावामुळे अजितदादा यांना हेलिकॉप्टर उड्डाण करण्यास परवानगी नाकारली

अजितदादा यांना हेलिकॉप्टर उड्डाण करण्यास परवानगी नाकारली

सिक्युरिटी च्या कारणास्तव परवानगी नाकारल्याची प्राथमिक माहिती...

साताऱ्यातून मुंबईला अजितदादा बाय रोड येणार आहेत

Mumbai Local: अखेर पाच तासांच्या प्रतीक्षेनंतर मुंबईतील हार्बर सेवा सुरू

नवी मुंबई वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या ठाणे ते वाशी, पनवेल, नेरूळ ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतुक ठप्प झाली होती.

ऐरोली पुलाचे गर्डर तिरके झाल्याने हा परिणाम झाला होता.

ठाणे ते वाशी अणि पनवेल या ठिकाणची सेवा सुरू झाली आहे.

बदलापूर नगरपरिषदेच्या वेबसाईटवर सायबर हल्ला?

वेबसाईटवर झळकले हॅक झाल्याचे संदेश

हॅक नसून व्हायरस असल्याचा मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांचा दावा

बदलापूर नगरपालिकेची वेबसाईट तूर्तास बंद

मावळ मध्ये काँग्रेसला मोठा झटका, युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्षांसह अनेक कार्यकर्त्यांनी सोडला काँग्रेसचा हात

मावळ तालुक्यात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष यांनी पक्षाचा हाच सोडला असून शिवसेना पक्षाचा भगवा खांद्यावर घेतला आहे.

मावळ तालुका युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेश वाघोले यांनी शिवसेना पक्षात जाहीर रित्या पक्ष प्रवेश केला आहे.

शिवसेना पक्षाचे प्रमुख अनिवराज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी मुंबई येथे पक्षप्रवेश केला आहे.

दरम्यान या सोहळ्याला खासदार श्रीरंग बारणे शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

काँग्रेस पक्षाचे एक धडाडीचे नेतृत्व म्हणून राजेश वाघोले यांच्याकडे पाहिले जायचे, काँग्रेसच्या युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष पद मिळाल्यानंतर पक्षात युवकांचे संघटन उभे करण्यासाठी त्यांनी चांगले काम केले होते.

तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही चांगले काम केले होते. त्यांनी पक्षाची साथ सोडल्याने मावळात काँग्रेस चे मोठे नुकसान झाले आहे....

Tata Hospital: परळमधील टाटा हॉस्पिटलबाहेर धमकीचा ई-मेल, सूत्रांची माहिती

टाटा हॉस्पिटलबाहेरील बंदोबस्त वाढवला

पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरु

नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्त्यांची घेतली बैठक

आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आता तयारीला लागेल्याचे दिसून येत आहेत.

नांदेडमध्ये शिवसेनेने देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात बैठकांचे सत्र सुरू केले आहे.

नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक नांदेड शहरातील शासकीय विश्रामगृहात घेण्यात आली.या बैठकीला नांदेड दक्षिणचे आमदार आनंद बोंढारकर हे उपस्थित होते.

येणाऱ्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत लढण्याची आमची इच्छा आहे.

परंतु महायुतीतील काही घटक पक्ष जर सोबळाचा नारा देत असतील तर आम्ही देखील आमची ताकद या जिल्ह्यात दाखवू आणि स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याची भूमिका शिवसेनेचे आमदार आनंद बोंढारकर यांनी व्यक्त केली.

मावळ तालुक्यात एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जोरदार झटका

मावळ शिवसेनेमध्ये जोरदार इनकमिंग सुरूच असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रमुख उपस्थित अनेक नाने मावळ मधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई मध्ये प्रवेश केला. मदन शेळगी तालुका संघटक उप तालुका उपप्रमुख सोमनाथ कुंडे यांच्यासह कामशेत शहर येथील उभाठा गटाचे उपशहर प्रमुख सुरेश लाड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत अधिकृत प्रवेश केला आह. त्यामुळे उद्धव ठाकरे शिवसेना सैर बैल झाल्याचे चित्र सध्या मावळात आहे. मावळचे खासदार श्रींग बारणे ही तिसऱ्या वेळा खासदार म्हणून निवडून आले आणि त्यांनी शिंदे गटात आणण्यासाठी सपाटच सुरू केला आहे.

Mumbai: साकीनाका परिसरात ड्रोन दिसल्यानं खळबळ

मुंबई विमानतळावरुन पोलिसांना माहिती

मशिदीवर ड्रोन घिरट्या घालत असल्याची माहिती

पोलिसांकडून तपास सुरु

मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर जाण्यास मनाई

Parbhani: वादळानंतर कमलापूर अंधारात, पाणीटंचाईमुळे नागरिक हैराण

सोमवारी आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे पूर्णा तालुक्यातील कमलापूरमध्ये वीज पुरवठा खंडित झाला आहे.

गावातील खांब कोसळल्याने अर्ध्या गावाला मागील 4 दिवसा पासून अंधारात राहावे लागत आहे.

परिणामी, बोअरवेल बंद असल्याने मुबलक पाणी असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

उन्हाळ्यामुळे त्रस्त नागरिकांना वीज नसल्याने अधिक त्रास सहन करावा लागत आहे. लहान मुले आणि वृद्ध बेहाल झाले आहेत.

ग्रामस्थांनी तात्काळ नवीन खांब बसवून वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे.

Maharashtra Politics: भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांकडून तातडीची बैठक

साऊथ ब्लॉकमध्ये तिन्ही सैन्यदलासोबत बैठक

बैठकीत सुरक्षेचा आढावा घेतला जाणार

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह बैठकीसाठी पोहोचले

भारत पाकिस्तान युद्धाच्या पाश्र्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर

तिलारी धरण प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करणार- पालकमंत्री नितेश राणे

नव्याने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची आज पालकमंत्री नितेश राणे व खासदार नारायण राणे करणार पाहणी

नाधवडे येथे एसटीला डंपरची धडक दोन प्रवासी किरकोळ जखमी

मसुरे येथे कृषी विभागाच्या विविध योजनांबाबत आज होणार शेतकऱ्यांना मार्गदर्शन

दोडामार्ग तळकट गावात हत्तीचा धुमाकुळ. नारळ, केळी, सुपारी च्या बागांचे नुकसान

भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर

भारत पाकिस्तान युद्धाच्या पाश्र्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.

कोकण किनारपट्टीसह शहरामध्ये पोलिसांकडून गस्त वाढवण्यात अली आहे.

समुद्रातून येणाऱ्या बोटींची तपासणी तसेच अनोळखी व्यक्तींची तपासणी पोलिसांकडून रात्रभर करण्यात आली.

हॉटेल, लॉजिंगची तपासणी देखील करण्यात आली.

मालवणमध्ये रात्री अचानक नाकाबंदी करण्यात आली होती. तर समुद्रकिनाऱ्यालगत 92 लँडिंग पॉइंट या ठिकाणी सागरी सुरक्षा दल यांच्यावतीने देखील रात्री ग्रस्त पाहायला मिळाली.

संशयित हालचाली किंवा संशयित व्यक्ती

आढळल्यास 112 नंबर किंवा सिंधुदुर्ग पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे

यशस्वी ऑपरेशन सिंदूरचे देशभरातून कौतुक, पैठण शहरात महिलांचा एकमेकींना पेढे भरवत जल्लोष

पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने यशस्वी ऑपरेशन सिन्दुर राबवून घेतला आहे. काल रात्री पाकिस्तानच्या कुरापतीला भारताने जशास तसे उत्तर दिल्यानंतर आज संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे नाथ मंदिर परिसरात महिलांनी एकमेकींना पेढे भरवत जल्लोष केला आहे . शिवसेना महिला आघाडीच्या वतीने पैठण शहरात जल्लोष करण्यात आला आहे.पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिल्यानंतर भारतीय सैन्याच्या कामगिरीवर जल्लोष करण्यात आला आहे.

Mumbai Local Train: ठाणे वाशी व ठाणे पनवेल वाहतूक ठप्प

नवी मुंबई वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या ठाणे ते वाशी, पनवेल, नेरूळ ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतुक ठप्प झाली आहे.

ऐरोली पुलाचे गर्डर तिरके झाल्याने हा परिणाम झाला आहे.

ट्रान्स हार्बर मार्गिकेवर रेल्वेगाड्या उपलब्ध नसल्याने सकाळी ठाणे, दिघा, ऐरोली रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी उसळली आहे.

नोकरदारांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

अनेकांनी घरचा रस्ता धरला. तर काही प्रवासी ठाण्याहून रस्ते मार्गे नवी मुंबईच्या दिशेने निघाले होते.

Shrimant Dagdusheth Halwai: दगडूशेठ मंदिरा बाहेर सुरक्षेसाठी बंदोबस्त वाढवला

भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात धार्मिकस्थळांभोवती सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पुण्यात कायम गर्दी असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराबाहेर qrt, कमांडो, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

Meghana Bordikar: राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केली दगडूशेठची आरती

- पाकिस्तानला सद्बुद्धी सुचू दे असं साकडं दगडूशेठ बाप्पाला घातलं

- ही परिस्थिती लवकरच शांत होऊ दे

- मोदींच्या नेतृत्वात देश सुरक्षित आहे

- कोणी काळजी करण्याचे कारण नाही आपल्या सुरक्षेसाठी मोदीजी सक्षम आहेत

"पाकिस्तान जिंदाबाद" म्हणणाऱ्या राखी सावंतविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

वाघोली पोलिस स्टेशनला राखी सावंतच्या भारतविरोधी वक्तव्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन देण्यात आले.

शिवसेनेचे ओंकार तुपे पाटील यांनी जाहीर केलं – "राखी सावंतला कानशिलात लगावणाऱ्या देशभक्त महिलेला 1 लाख रुपयांचे बक्षीस!"

देशविरोधी वक्तव्य सहन केले जाणार नाही!

अमृता फडणवीसनाविषयी आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी गुन्हा दाखल

सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या एका व्यक्ती विरोधात पुणे सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या बद्दल चुकीची माहिती आणि आक्षेपार्ह भाषा वापरून त्यांची मानहानी केल्याचं तक्रारीत नमूद

आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पथक कार्यरत करण्यात आली आहे.

Ratnagiri Unseasonal Rain: सलग दुसऱ्या दिवशी पहाटेपासून रत्नागिरीत अवकाळी पावसाला सुरुवात

हवामान खात्याच्या इशारा नंतर सलग दुसऱ्या दिवशी पहाटेपासून रत्नागिरीत अवकाळी पावसाला सुरुवात झाली.

समुद्रातील वातावरणीय बदलामुळे रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याचा हाय अलर्ट चा इशारा देण्यात आला आहे.

सागरी किनारपट्टी भागातही अवकाळी पावसाने जोरदार बॅटिंग केली. पहाटेपासून पडलेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागामध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला आहे..

Washim: फास लागून दगावल्या दोन नीलगाय जागेवरच कुजल्या, वन विभागाची दिरंगाई

वाशिममध्ये उन्हाचा कडाका वाढल्याने पाण्याच्या शोधात वन्यप्राणी शेतशिवार, लोकवस्तीकडे धाव घेत आहेत.

यातून काही वन्यप्राण्यांचा जीव गेला असताना दगावलेल्या वन्यजीवांची विल्हेवाट लावण्यात वनविभागाकडून प्रचंड दिरंगाई झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय,

वाशिमच्या मालेगांव वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या किन्हिराजा वन वर्तुळातील सोनाळा परिसरात फास गळ्यात अडकून दोन नीलगाई दगावल्या होत्या.

या नीलगाईची रितसर विल्हेवाट न लावल्याने या नीलगाई जागेवरच कुजल्या.

धाराशिव शहरालगतच्या सर्व्हिस रोड व नालीचे काम निकृष्ट, गुणवत्ता न राखल्यास तिव्र आंदोलनाचा इशारा

धाराशिव शहरालगतच्या सर्व्हिस रोड व नालीचे काम निकृष्ट केले असुन गुणवत्ता न राखल्यास आंदोलनाचा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आलाय.

ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेवुन याबाबत निवेदन दिलंय.

शहरातुन जाणाऱ्या धुळे - सोलापूर महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडच्या दोन्ही बाजुने केलेल्या नालीवरील स्लॅब काही दिवसातच कोसळला अनेक ठिकाणी नालीवर भगदाड पडल्याने वाहन धारक नागरीकांना धोका निर्माण झाला आहे.

त्यामुळे या कामाची पाहणी करावी व गुणवत्ता पुर्ण काम करण्याबाबत संबधितांना सुचना द्याव्या अन्यथा तिव्र आंदोलनाचा इशारा ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आला आहे.

Maharashtra Weather: वादळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात मोठी घट

आज मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सातारा आणि कोल्हापूर, मराठवाड्यातील, छत्रपती संभाजीनगर, तसेच विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

Bombay High Court: उच्च न्यायालयाची जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्याधिकाऱ्यांना नोटीस

यवतमाळ पालिकेच्या विद्युत विभागातील निविदा प्रक्रियेबाबत झालेल्या एका याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निविदा दस्तऐवजांमध्ये संभाव्य छेडछाडीबाबत गंभीर निरीक्षण नोंदवले आहे. ही सुनावणी न्यायमूर्ती नितीन डब्ल्यू सांबरे आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या खंडपीठासमोर झाली या प्रकरणात यवतमाळ जिल्हाधिकारी तसेच पालिकेचे मुख्याधिकारी यांना नोटीस देऊन उत्तर सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.

Hingoli: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे अहवाल सादर, मदत कधी मिळणार

हिंगोली जिल्ह्यात मागच्या आठ दिवसात वादळी वारे व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या बागायती पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले होते प्रशासनाच्या आदेशानंतर कृषी सहायकांनी शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त शेतात दाखल होत या संपूर्ण नुकसानीचे पंचनामे करून शासनाला अहवाल सादर केला आहे यामध्ये केळी बागांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाला प्राप्त झाली असून केळी उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने भरीव मदत जाहीर करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे

Dharashiv: धाराशिवमध्ये जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात मराठा समाजाचे केले ठिय्या आंदोलन

धाराशिव मध्ये जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.

दरम्यान समीतीच्या निष्क्रियतेमुळे जात वैधता प्रमाणपत्राच्या शेकडो फायली प्रलंबित आहेत या फायली निकाली काढल्या जात नसुन तारीख पे तारीख देत अडवणूक केली जात आहे.

समीतीमधील अधिकारी गैरसमज राहत असल्याने संतप्त मराठा समाजाच्या तरुणांनी ठिय्या आंदोलन केले

दरम्यान पुढील आठवड्यात वैयक्तिक दाव्यानुसार सुनावणी घेण्याचे आश्वासन संबधित सदस्यांनी दिल्याने आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले तर जात प्रमाणपत्र पडताळणीच्या कामाला गती द्यावी,

दिलेल्या वेळी आठवड्यातील ठरावीक दिवशी तिन्ही सदस्यांची कार्यालयातील एकञित उपस्थिती बंधनकारक करावी आदी मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.

Bhiwandi: भिवंडीमध्ये पाकिस्तानच्या समर्थनार्थ पोस्ट करणाऱ्या युवकाला अटक...

भिवंडीतील कल्याण नाका घुंघट नगर परिसरात राहणाऱ्या एका मुस्लिम युवकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पाकिस्तानच्या समर्थनार्थ पोस्ट केली होती. .

चाहे जो हो जाये सपोट बस पाकिस्तान को करेंगे ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भिवंडी शहर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत युवकाविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

Hingoli: हिंगोलीत पपईच्या बागेवर बुरशी आजारांचे थैमान

हिंगोली जिल्ह्यात मागच्या आठ दिवसात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असताना आता याच वातावरण बदलाचा फटका पपई उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून अचानक पपईच्या बागांवर बुरशीजन्य रोगाने आक्रमण केले आहे यामुळे हातात तोंडाशी आलेल्या पपई बाग नष्ट होत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत दरम्यान कृषी विभागाच्या कृषी अधिकाऱ्यांसह कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे आवाहन यावेळी शेतकऱ्यांनी केले आहे

Hingoli: हिंगोलीत टँकर संख्या वाढली, टँकर द्वारे पाणीपुरवठा सुरू

उन्हाळ्याच्या शेवटच्या महिन्यात हिंगोली शहरात भीषण पाणीटंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे

या पाणीटंचाईचे अधिक चटके बसत असल्याने नागरिक टँकरद्वारे पाणी खरेदी करत आहेत,

सध्या हिंगोली 80 पेक्षा जास्त टॅंकर ऍक्टिव्ह असून, प्रति टँकर 800 ते हजार रुपये दराने नागरिक पाण्याची खरेदी करत आहेत

दरम्यान हिंगोली पालिकेने नागरिकांना पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा दर पाच दिवस आड सुरू केल्याने पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी देखील नागरिकांची भटकंती सुरू आहे

लोहारा शहरातील घनकचरा प्रकल्पामुळे अस्वच्छता, दुर्गंधी; नगर पंचायतीचा हलगर्जीपणा

धाराशिव जिल्ह्यातील लोहारा शहरातील शासकीय धान्य गोदामाजवळ नगरपंचायतीने उभारलेल्या घनकचरा प्रकल्पामुळे परीसरात अस्वच्छता व दुर्गंधीमुळे आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत

या घनकचरा प्रकल्पाची ठाकरे गटाचे आमदार प्रविण स्वामी यांनी पाहणी करुन नगरपंचायत च्या कामावर नाराजी व्यक्त केली.

तर पावसाळा तोंडावर आला असुन अशा स्थितीत दुर्गंधी व संसर्गजन्य रोगांचा धोका अधिकच वाढु शकतो

त्यामुळे तातडीने कचर्याचे योग्य विलगीकरण, निर्जंतुकिकरण व्यवस्थापन सुधारणा व आराखड्याचे पुनर्मूल्यांकन व्हावे अन्यथा याची जबाबदारी संबधित अधिकाऱ्यांवर निश्चित केली जाईल असा इशारा दिलाय

तर यावेळी अधिकारी व ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Jalna: जालना जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे बागायती आणि फळबागांचे 20 कोटींची नुकसान

जालना जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे बागायती आणि फळबागांची 20 कोटींची नुकसान झालं आहे.

नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाला आहे.जालना जिल्ह्यात 5 आणि 6 मे रोजी वादळी वाऱ्यासह बेमोसमी पाऊस आणि गारपीटीमुळे नुकसान झालं होत .

नुकसानीचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून यात जालना, बदनापूर आणि परतुर तालुक्यातील 184 गावातील 2638 शेतकरी बाधित झाले असून 1133 हेक्टर बागायती तर 789 हेक्टर फळपिकांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान हा नुकसानीचा प्राथमिक अंदाज असून पंचनामे पूर्ण झाल्यानंतर अहवालात बदल होऊ शकतो अशी माहिती प्रशासनाने दिली आहे..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.