Pune Airport : तिसऱ्या दिवशी पुणे विमानतळावरील नऊ उड्डाणे रद्द
esakal May 10, 2025 07:45 AM

पुणे : ‘ऑपरेशन सिंदूर’ लष्करी मोहिमेनंतर पुणे विमानतळांवरील उड्डाण सेवा सलग तिसऱ्या दिवशी तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शनिवारी (ता. ९) इंडिगो एअरलाइन्स आणि स्पाइसजेट या विमानसेवा कंपन्यांची नऊ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

याबाबत संबंधित प्रवाशांना विमानतळ प्रशासन आणि विमान कंपन्यांकडून वेळेवर माहिती देण्यात आली आहे. या प्रवाशांना पूर्ण परतावा किंवा पर्यायी प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली.

रद्द झालेली उड्डाणे

इंडिगो एअरलाइन्स : अमृतसर- पुणे, चंडीगड- पुणे, पुणे- चंडीगड, पुणे- अमृतसर, नागपूर-पुणे, पुणे- जोधपूर, जोधपूर- पुणे.

स्पाइसजेट : जयपूर- पुणे आणि पुणे- भावनगर

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.