बकरवाल हे जम्मू-काश्मीरमधील भटकंती करणारे एक पारंपरिक मेंढपाळ समाज आहे. ते मुख्यतः मेंढ्या आणि बकऱ्या चारून उदरनिर्वाह करतात.
प्रत्येक उन्हाळ्यात बकरवाल लडाख आणि काश्मीरकडे स्थलांतर करतात आणि हिवाळ्यात जम्मूला परत येतात.
‘बकर’ म्हणजे बकरी आणि ‘वाल’ म्हणजे रक्षक. या शब्दांपासूनच ‘बकरवाल’ हे नाव तयार झालं आहे.
बकरवाल समाजात हिंदू, मुस्लीम आणि शीख धर्मांचं मिश्रण आहे. ते विविध धर्मांचे सण समरसतेने साजरे करतात.
बैसाखी, लोरी, गोवर्धन हे सण बकरवाल समाजात मोठ्या उत्साहात साजरे होतात.
बकरवाल समाजात धर्माच्या बाबतीत कोणतीही कट्टरता नाही. ते सर्व धर्मांचा सन्मान करतात.
भारताविरुद्ध उभ्या राहिलेल्या कोणत्याही शक्तींचा बकरवाल समाजाने कायम विरोध केला आहे.
१९६५ मध्ये पाकिस्तानी घुसखोरीबाबत भारतीय सैन्याला माहिती दिल्यामुळे जागीर यांना पद्मश्री मिळाला होता.
पाकिस्तानच्या प्रभावापासून समाजाला दूर ठेवण्यासाठी मौलवी गुलाम दिन यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांना अशोक चक्र मिळालं.
१९९९ च्या कारगिल युद्धातही बकरवाल समाजाने पाकी घुसखोरीबद्दल भारतीय सैन्याला वेळेवर माहिती दिली.