बंगळूर : सीबीआय न्यायालयाने दोषी ठरवलेले जनार्दन रेड्डी यांना आमदारपदासाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. विधानसभा सचिवांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आणि सांगितले आहे की, रेड्डी यांना अपात्र ठरविले आहे. त्यामुळे विधानसभेची संख्या एकने कमी होऊन २२३ इतकी झाली आहे. लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत न्यायालयाने दोषी ठरवलेल्या लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व रद्द केले जाईल. जनार्दन रेड्डी तुरुंगातून सुटल्यानंतरही ते सहा वर्षे निवडणूक लढवू शकत नाहीत.
Dapoli News : लाडघर समुद्रात अजस्त्र बार्ज दिसल्याने यंत्रणा 'अलर्ट'दापोली : तालुक्यातील लाडघर समुद्रात टॉवर असलेली अजस्त्र बार्ज नजरेस पडली. त्यामुळे सर्वच यंत्रणा ‘अलर्ट मोड’वर आली होती. मात्र ही बार्ज संशयास्पद नसल्याची खात्री पोलिस यंत्रणेकडून करण्यात आली आहे. लाडघर आणि हर्णे समुद्राच्या मध्यभागी एक बार्ज दृष्टीस पडली.
India-Pakistan War : भारत-पाकिस्तानमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशात सुकामेवा आयात बंदनाशिक : भारताने पाकिस्तानशी व्यापार बंद केल्यानंतर अफगाणिस्तानवरून येणारा सुकामेवा देशात येणे बंद झाले आहे. परिणामी, सुकामेवा भविष्यात महाग होऊ शकतो. बांगलादेशने कांदा, संत्री आयातीवर जानेवारीपासूनच शुल्क लागू केले आहे. त्यामुळे या वस्तूंच्या देशांतर्गत किमती वाढण्याची शक्यता निर्यातदारांनी वर्तविली आहे. भारत व पाकिस्तानमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अटारी येथील एकात्मिक तपासणी नाका (आयसीपी) तत्काळ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Operation Sindoor : आंतरराष्ट्रीय सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; सात दहशतवाद्यांचा खात्माजम्मू : सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी जम्मूनजीकच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरून होणारा घुसखोरीचा प्रयत्न फोल ठरवत सात दहशतवाद्यांना ठार मारले. तसेच, एक बंकरही उद्ध्वस्त केले.
Operation Sindoor : लेह ते सर खाडीपर्यंत पाकिस्तानकडून ३६ ठिकाणी तब्बल ४०० ड्रोनद्वारे हल्लाLatest Marathi Live Updates 10 May 2025 : भारतातील शहरांवर हल्ले करतानाच भारतावरच चुकीचे आरोप करत कांगावा करणाऱ्या पाकिस्तानला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने उघडे पाडले. पाकिस्तानने गुरुवारी रात्री भारतात लेह ते सर खाडीपर्यंत ३६ ठिकाणी सुमारे ४०० ड्रोनद्वारे हल्ला करून सर्वसामान्य नागरिकांना आणि लष्करी ठिकाणांना लक्ष्य केल्याचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी स्पष्ट केले. पाकिस्तानने सलग तिसऱ्या दिवशी भारतातील विविध शहरांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. सीमेवरील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये अन्नधान्याचा पुरेसा साठा असून, आरोग्य यंत्रणाही सक्षम असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले. भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर नौदल विभाग व मत्स्य व्यवसाय विभागाची ७ मे रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीमध्ये भारतीय नौदल विभागाकडून ‘ऑफशोअर डिफेन्स एरिया’ मासेमारी प्रतिबंध क्षेत्र (नो फिशिंग झोन) घोषित करण्यात आले आहे. भारताने पाकिस्तानशी व्यापार बंद केल्यानंतर अफगाणिस्तानवरून येणारा सुकामेवा देशात येणे बंद झाले आहे. मुंबईवरील हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणा याचा कोठडीतील मुक्काम सहा जूनपर्यंत वाढला आहे. ‘एनआयए’च्या विनंतीनुसार न्यायालयाने राणा याच्या कोठडीत वाढ केली. त्याचबरोबर राज्यातील वातावरणात बदल पहायला मिळत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..