Ragi oats dhokla: मे महिन्यात पावसाने हजेरी लावली असून तुम्हाला सकाळी नाश्त्यात काही पौष्टिक खायचे असेल तर नाचणी-ओट्स ढोकळा खाऊ शकता. हा ढोकळा बनवणे सोपा असून चवदार देखील आहे. चला तर मग जाणूवन घेऊया पौष्टिक नाचणी-ओट्स ढोकळा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.
पौष्टिक नाचणी-ओट्स ढोकळा बनवण्यासाठी लागणारे साहित्यनाचणीचे पीठ - १ कप
ओट्स पावडर - अर्धा कप
बेसन - अर्धा कप
दही - अर्धा कप
चवीनुसार मीठ
सोडा - एक चिमूटभर
आल्याची पेस्ट - १ टीस्पून
तेल - २ टीस्पून
मोहरी - १/२ टीस्पून
जिरे - अर्धा टीस्पून
कढीपत्ता - २-३
हिरव्या मिरच्यांचे तुकडे - एक
पौष्टिक नाचणी-ओट्स ढोकळा बनवण्याची कृतीसर्वात आधी एका भांड्यात नाचणीचे पीठ, ओट्स पावडर आणि बेसन मिसळा.
नंतर त्याचे पीठ तयार करा आणि रात्रभर तसेच राहू द्या.
नंतर दुसऱ्या दिवशी मीठ, दही, आले पेस्ट घाला आणि चांगले मिसळा.
आता त्यात थोडे तेलही मिसळा.
आता हे पीठ 15-20 मिनिटे वाफवून घ्या. थंड झाल्यावर त्याचे तुकडे करा.
तेल, मोहरी, कढीपत्ता घालून फोडणी तयार करा आणि ढोकळ्यात घाला.
सजावटीसाठी बारिक चिरलेली कोथिंबीरची आणि किसलेले नारळ वापरा. हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.