पाकिस्तानकडून ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु भारताकडून पाकिस्तानचे सर्व हल्ले निकामी केले जात आहे. मागील 24 तासांत पाकिस्ताने 26 ठिकाणी हल्ले करण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतीय लष्कराने त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यामुळे आता पाकिस्तान चांगलाच अडचणीत आला आहे.
भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या सात ठिकाणांवर हल्ले करुन खूप मोठे नुकसान केले आहे. भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तान घाबरला आहे. भारतीय लष्कराने पाकिस्तानचे 5 एअरबेस आणि 2 रडार बेस पूर्णपणे नष्ट केले आहे. त्यामुध्ये नूर खान, रहमियार खान, रफीकुई, मुरीद, सियालकोट एअर बेसचा समावेश आहे. तसेच 2 रडार बेस सिस्टम उद्ध्वस्त केली आहे. पाकिस्तानमधील स्थानिक लोकांनी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ भारताकडून पाकिस्तानात झालेल्या नुकसानीच्या पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये भारतीय क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यामुळे जमिनीत मोठे खड्डे दिसत आहेत. पाकिस्तानी सैन्य आता हे फोटो आणि व्हिडिओ डिलीट करण्यात व्यस्त आहे.
दुसरीकडे पाकिस्तानकडून करण्यात येणारे दावे भारताने फेटाळले आहे. भारताची S 400 , ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा भंडार पूर्णपणे सुरक्षित आहे. परंतु पाकिस्तानकडून खोटी माहिती पसरवली जात आहे, असे भारताने म्हटले आहे.
भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तान हादरला आहे. भारतावर प्रतिहल्ला करण्यासाठी पाकिस्तानकडूनही अधिकृतपणे ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. या ऑपरेशन अंतर्गत पाकिस्तान भारताच्या निवासी भागात आणि लष्करी केंद्रांना लक्ष्य करुन हल्ले करत आहे. त्याला भारतीय सैन्याकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाता आहे. पाकिस्तानने भारताविरुद्धच्या कारवाईला ऑपरेशन बुनयान अल मारसूस नाव दिले आहे. त्याचा अर्थ काचेसारखी मजबूत भिंत आहे. म्हणजेच खूप मजबूतपणे संरक्षण करणारी भिंत असा अर्थ आहे. या नावाने पाकिस्तान जगासमोर स्वतःला मजबूत दाखवू इच्छित आहे.
पाकिस्तानकडून ऑपरेशनला उत्तर देत शनिवारी पहाटे भारतावर हल्ले सुरु केले. पाकिस्तानने फतेह-1 क्षेपणास्त्र डागले आहे. रेडिओ पाकिस्ताननुसार, पाकिस्तानने ऑपरेशन बुनयान अल मरसूस सुरु केला आहे. हे नाव कुरानमधील एका आयतमधून घेतले आहे. त्याचा अर्थ मजबूत भिंत असा होता. या ऑपरेशन अंतर्गत भारताच्या अनेक शहरांवर पाकिस्ताने हल्ले केले. परंतु भारताने हे सर्व हल्ले परतवून लावले.