Act of War: भारतात आजवर पाकिस्तान पुरस्कृत अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत. त्याला भारतानं प्रत्येकवेळी सडोतोड उत्तर दिलं आहे, पण भारताना अनेकदा मोठं नुकसानही सोसावं लागलं आहे. तरीही आजवर दहशतवादी हल्ल्याला एक समस्या म्हणून गणलं जात होतं. पण आता असं होणार नाही.
कारण यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा भारताविरोधातील 'अॅक्ट ऑफ वॉर' म्हणून गणला जाईल आणि त्याचं पातळीवर त्याला प्रत्युत्तरही दिलं जाईल, अशी भूमिका भारतानं घेतली आहे.
एएनआयनं केंद्र सरकारच्या बड्या अधिकारी सुत्रांच्या हवाल्यानं माहिती देताना म्हटलं की, भारतानं आता हे निश्चित केलं आहे की, भविष्यातील कुठलाही दहशतवादी हल्ला हा भारताविरोधातील युद्धाची चिथावणी असं समजलं जाणार आहे. त्याचबरोबर या कृतीला त्याचपद्धतीचं उत्तरही दिलं जाईल.
यावरुन हे स्पष्ट होतं की, केंद्र सरकारनं आता भविष्यातील कुठल्याही दहशतवादी हल्ल्याविरोधात ठाम भूमिका घेतली आहे. यावरुन भारताच्या सार्वभौमत्वाचं संरक्षण आणि दहशतवादाला थेटपणे विरोध केला जाईल.