भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध सुरूच आहे. दहशतवादाला आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला त्याच्या कृत्यांची शिक्षा मिळत आहे. भारताने केलेल्या प्रत्येक हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून केलेल्या प्रत्युत्तर कारवाईत पाकिस्तानचे मोठे नुकसान होत आहे. आतापर्यंतच्या कारवाईत पाकिस्तानच्या अनेक लष्करी आस्थापनांचे आणि मालमत्तांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही देश एकमेकांवर ड्रोन हल्ले करत आहेत. यात आता एक व्हिडिओ समोर आला आहे. यात भारताचा ड्रोन लाहोरमध्ये चोरीला गेल्याचे सांगण्यात येत आहे.
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आणि लाहोर आणि इतर प्रमुख शहरांमध्ये मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले. जरी पाकिस्तानी सैन्याने दावा केला की, भारताने डागलेले बॅलिस्टिक क्षेपणास्त्र भारतीय हद्दीत पडले. भारताकडून या संदर्भात काहीही सांगण्यात आलेले नाही. दुसरीकडे सीमेपलीकडून पाकिस्तानने केलेल्या अनेक ड्रोन हल्ल्यांनंतर भारतानेही प्रत्युत्तर दिले. पाकव्याप्त काश्मीर (पीओके) नीलम व्हॅली आणि सियालकोटमध्ये मोठा हल्ला केला. या हल्ल्यात पाकिस्तानचेही मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. यात आता एक व्हिडिओ समोर आला.
या व्हिडिओत एक तरूण भारताने पाठवलेला एक लाहोरमध्ये चोरीला गेला असे म्हणत आहे. दोन तरुणांनी जमिनीवर पडलेला ड्रोन चोरून नेला. यातील एक जणाला पकडलं आहे. काल रात्री लाहोर डीएचए फेज ६ मधून भारतीय ड्रोन चोरीला गेला आहे, असं सांगण्यात आले आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
रावळपिंडीतील नूर खान, चकवालमधील मुरीद आणि शोरकोटमधील रफीकी यांच्या हवाई तळांवर हल्ला करण्यात आला. याशिवाय रहिमयार खान एअरबेस देखील उद्ध्वस्त झाला आहे. हल्ल्यामुळे तेथील परिस्थिती खूपच वाईट झाली आहे. हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानने आज दुपारी १२ वाजेपर्यंत आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. पेशावरला जाणारे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (पीआयए) चे विमान पीआयए२१८, जे त्यांच्या हवाई हद्दीतील शेवटचे उड्डाण होते, त्याला क्वेट्टावरून उड्डाण करण्यास भाग पाडण्यात आले.