किन्हवली, ता. १० (बातमीदार)ः शहापूर येथील ग. वि. खाडे विद्यालयाची माजी विद्यार्थिनी मधुरा पाटील ही लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षा २०२३ मध्ये यशस्वी झाली असून मंत्रालयात कक्ष अधिकारी गट- ब (राजपत्रित अधिकारी) म्हणून नियुक्ती झाली आहे.
शहापूरच्या ग. वि. खाडे विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक आर. के. पाटील आणि मीनाक्षी पाटील यांची कन्या असलेल्या मधुराने २०२३च्या लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण झाली होती. तिने मिळवलेल्या यशामुळेच तिची मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून निवड झाली आहे.