ठाणे, ता. १० (बातमीदार)ः ठाण्यात आचार्य अत्रे कट्टा, जिजाऊ उद्यान येथे बुधवार (ता. १४) सायंकाळी सहा वाजता ‘टाटा एक अतूट विश्वास’ या विषयावरील व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध लेखक माधव जोशी हे जमशेदजी टाटा ते रतन टाटा यांच्या प्रेरणादायी आठवणी उलगडणार आहेत. टाटा घराण्याचे उद्योग, राष्ट्रप्रेम व सामाजिक बांधिलकी यांचा मागोवा घेत टाटा संस्कृतीची ओळख व्याख्यानातून घडणार आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमाला उपस्थिती लावावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.