Maharashtra Live News Update: कल्याण डोंबिवलीत पोलिसांकडून ऑलआउट कोंबिंग ऑपरेशन
Saam TV May 11, 2025 02:45 AM
कल्याण डोंबिवलीत पोलिसांकडून ऑलआउट कोंबिंग ऑपरेशन

देशात सुरु असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक सुरक्षा यंत्रणा देखील सक्रीय झाली आहे. कल्याण डोंबिवलीत पोलीसांकडून शुक्रवारी रात्री ऑलआउट कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले.या कोम्बिंग ऑपरेशन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 25 गुन्हे दाखल करण्यात आले 66 वाहनावर मोटर वाहन अधिनियम कायद्यान्वये कारवाई करत 78 हजाराचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्ताक्डून देण्यात आली आहे.

भारत आणि पाकिस्तान युद्ध थांबवण्यास मी तयार - डोनाल्ड ट्रम्प

भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिति सुरू आहे, आता यामध्ये अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी ट्विट करत मध्यस्थी करण्यासाठी तयार असल्याची सांगितले आहे

रुग्णवाहिका उशिरा आल्याने एका वृद्धाचा मृत्यू. नातेवाईकांचा आरोप.

108 रुग्णवाहिका उशिरा आल्याने एका वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना नांदेडच्या हिमायतनगर येथे घडली. मारुती पारडकर असं या मृत्यू झालेल्या वृद्धाच नाव आहे. पारडकर यांना उपचारासाठी हिमायतनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. नांदेड येथे हलवण्यासाठी नातेवाईकांनी 108 रुग्णवाहिकेला संपर्क केला. परंतु 108 रुग्णवाहिका जवळपास अडीच तास उशिरा आली. रुग्णवाहिका उशिरा आल्याने मारुती पारडकर या वृद्धाचा मृत्यू झाला.

पुण्यातून जम्मूकडे जाणारी रेल्वे सेवा रद्द

पुण्यातून जम्मूकडे जाणारी रेल्वे सेवा रद्द

पुण्यातून जम्मू तवी एक्सप्रेस दिल्लीपर्यंतच धावणार

आज आणि उद्या पुण्यातून सुटणारी जम्मू तवी एक्सप्रेस दिल्लीपर्यंतच

तसेच जम्मू मधून सुटणारी जम्मू तवी एक्सप्रेस दिल्लीवरून पुण्याच्या दिशेने निघणार

आपत्कालीन परिस्थितीत व अपरिहार्य कारणांमुळे पुण्याहून सुटणाऱ्या रेल्वे मध्ये बदल

जोधपूर पुणे (हडपसर) एक्सप्रेस आज आणि उद्या रद्द

१३ मे पर्यंत या दोन्ही रेल्वे गाड्यांमध्ये बदल

प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी रेल्वेचे वेळापत्रक बघण्याच्या प्रशासनाकडून सूचना

पुण्यातून जम्मूकडे जाणारी रेल्वे सेवा रद्द पुण्यातून जम्मू तवी एक्सप्रेस दिल्लीपर्यंतच धावणार आज आणि उद्या पुण्यातून सुटणारी जम्मू तवी एक्सप्रेस दिल्लीपर्यंतच तसेच जम्मू मधून सुटणारी जम्मू तवी एक्सप्रेस दिल्लीवरून पुण्याच्या दिशेने निघणार आपत्कालीन परिस्थितीत व अपरिहार्य कारणांमुळे पुण्याहून सुटणाऱ्या रेल्वे मध्ये बदल जोधपूर पुणे (हडपसर) एक्सप्रेस आज आणि उद्या रद्द १३ मे पर्यंत या दोन्ही रेल्वे गाड्यांमध्ये बदल प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी रेल्वेचे वेळापत्रक बघण्याच्या प्रशासनाकडून सूचनाअमरावतीत अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

अमरावतीत अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

अमरावतीच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस....

शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता

सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक परिसरातील बत्ती गुल..

या अवकाळी पावसामुळे उन्हाळी हंगामातील पिकांना धोका..

भुईमुंग, तीळ, टरबूज, खरबूज, संत्रा, कांदा आणि आंबा पिकाचे नुकसानीची शक्यता..

शिवधर्म फाउंडेशनच पंतप्रधान मोदींना पत्र सीमेवर लढण्याची परवानगी देण्याची केली मागणी..

देशात सध्या भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू झाली आहे.सातत्याने भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले प्रतिहल्ले केले जात आहेत.एकीकडे पाकिस्तानचे सैन्य सीमेवरून पळून जातानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत तर दुसरीकडे आता महाराष्ट्रातील तरुण सीमेवर लढण्याची मागणी करतायेत.बारामती आणि इंदापूर मधील शिवधर्म फाउंडेशनच्या शेकडो युवकांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहीत आम्हाला भारत मातेच्या संरक्षणासाठी सीमेवर लढण्याची परवानगी द्यावी आणि पाकद्यांच्या छातीत चार गोळ्या घालण्याची संधी द्यावी.अशी मागणी करणारे पत्र शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या वतीने पंतप्रधान मोदींना पाठवण्यात आलेय..

भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थानने घेतला मोठा निर्णय

उद्यापासून साई मंदिरात फुलहार आणि प्रसाद नेण्यास मनाई

जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी घेतली साईबाबा संस्थांनसह बैठक..

बैठकीनंतर मंदिर परिसरात केली पाहणी...

खबरदारीचा उपाय म्हणून साईबाबा संस्थानने घेतला निर्णय...

पुढील आदेशापर्यंत साईमंदिरात फुलहार आणि प्रसाद नेण्यास मनाई...

साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांची माहिती...

शिवसेनेचा ट्रॅक्टर मोर्चा स्थगित,कर्जमाफी साठी निघणार होता मोर्चा

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.सध्या भारत पाकिस्तान दरम्यान युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने राष्ट्रीय भावनेतून शिवसेना ठाकरे पक्षाने मोर्चा स्थगित केल्याची जाहीर केले असून हा ट्रॅक्टर मोर्चा यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार होता.

युद्धात भारताच्या विजयासाठी आणि सैनिकांच्या सुरक्षेसाठी अंबाबाईला साकडे

सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत भारताला विजय मिळावा, जगभरात भारताबद्दल अनुकुलता निर्माण व्हावी आणि भारतीय सैन्य तसेच नागरिक सुरक्षित रहावेत यासाठी करवीर निवासिनी अंबाबाईला साकडे घालण्यात आले आहे.

मालेगावात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची दमदार हजेरी

वाशीम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सूर्य आग ओकतोय, त्यामुळे नागरिक गर्मीने हैराण झाले होते. मात्र, आज सकाळपासून वातावरणात बदल जाणवत दुपारी मालेगाव तालुक्यासह जिल्ह्याच्या काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली.

रानडुकराच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू, सावळी शेत शिवारातील घटना

वाशिमच्या सावळी शेत शिवारात शेतात काम करत असताना अचानक शेतकऱ्यावर रानडुकराने हल्ला केल्याची घटना घडली आहे, या रानडुकराच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून, बाळू भगत असे मृत शेतकऱ्याचं नाव आहे.

अमरावतीत पाकिस्तानमधून आले धमकीचे कॉल, पोलीस हायअलर्टवर

अमरावतीच्या नांदगाव पेठ येथील एका कंपनीच्या कर्मचाऱ्याला पाकिस्तानमधून (+92 क्रमांकावरून) व्हॉट्सअॅपवर चार वेळा ऑडिओ कॉल येऊन गेले, या कॉलद्वारे कंपनी आणि कारखान्यावर बॉम्बहल्ल्याची धमकी देण्यात आली.

सायरनचा आवाज वापरू नका, गृह मंत्रालयाचा न्यूज चॅनेल्सना आदेश

▪ केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सर्व न्यूज चॅनेल्ससाठी निवेदन जारी
▪ सामुदायिक जागरूकता मोहिमांव्यतिरिक्त कोणत्याही कार्यक्रमात सायरनचा आवाज टाळावा
▪ नागरी संरक्षणासाठी वापरला जाणारा हवाई हल्ल्याचा सायरन मीडिया कार्यक्रमांमध्ये वापरू नये
▪ गृह मंत्रालयाकडून सर्व चॅनेल्सना काटेकोरपणे आदेश.

जागेच्या वादावरून नांदेडच्या सरपंच महिलेसह पतीला मारहाण

जागेच्या वादावरून इंजेगावच्या सरपंच महिलेसह पतीला मारहाण

नांदेडच्या फत्तेपूर शिवारात ही घटना घडली.

चार ते पाच जणांनी सरपंच महिला आणि त्यांच्या पतीला मारहाण केल्याची माहिती आहे.

मारहाण करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

युद्धजन्य परिस्थितीत नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय सज्ज

भारत-पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थिती पाहता, नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात तयारी सुरू झाली आहे. आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मेडिकलमध्ये रॅपिड रिस्पॉन्स टीम तयार करण्यात आली आहे. स्वतंत्र डिजास्टर वॉर्ड सज्ज करण्यात आला आहे.

वेरूळ घृष्णेश्वर मंदिर परिसरात सुरक्षा वाढवली, सीसीटीव्हीमार्फत कडक निगराणी

सिंदूर ऑपरेशननंतर भारताने पाकिस्तानवर केलेल्या पलटवाराचे पडसाद वेरूळ येथे उमटले आहेत.

जगप्रसिद्ध वेरूळ लेणी आणि बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

मंदिर परिसरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाची कसून तपासणी केली जात आहे. अजिंठा प्रायव्हेट लिमिटेडच्या सुरक्षा रक्षकांकडून ही तपासणी केली जात आहे.

मंदिरात प्रवेश करताना कोणतेही साहित्य जवळ बाळगण्यास परवानगी नाही.

मोबाईल, कॅमेरा आणि बॅग तपासणी करूनच आत नेण्याची परवानगी दिली जाते. त्याचबरोबर सीसीटीव्ही मार्फत देखील कडक निगराणी ठेवली जात आहे.

अमेरिकेनेकडून भारत-पाकिस्तान तणान कमी करण्याचा निर्णय

अमेरिकेने तणाव कमी करण्याचे प्रयत्न तीव्र केले, मार्को रुबियो यांनी पाकचे परराष्ट्रमंत्री, लष्करप्रमुख आणि परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्याशी संवाद साधला

Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे उद्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे उद्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.

अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नांदेडच्या मुखेड येथील चव्हाणवाडी मध्ये पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.

या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शेषराव चव्हाण यांच्यासह इतर पक्षातील अनेक दिग्गज नेते राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत.

अजित पवार यांच्या दौऱ्याची राष्ट्रवादीने जय्यत तयारी केली आहे.

अजित पवार यांच्या समवेत राष्ट्रवादीचे नेते देखील या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली.

बदलापूरमध्ये पार पडलं “ऑपरेशन अभ्यास” मॉक ड्रिल

बदलापूरमध्ये केंद्रीय गृह विभागाच्या सूचनांनुसार आपत्कालीन परिस्थितीतील सज्जता तपासण्यासाठी “ऑपरेशन अभ्यास” या मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं.

बदलापूर पूर्वेच्या शिरगाव माऊली चौकात हे मॉकड्रिल पार पडलं.

या मॉकड्रिलमध्ये सायरन वाजवत हवाई हल्ल्याची पूर्वसूचना कशाप्रकारे देण्यात येईल, हे दाखवण्यात आलं.

त्यानंतर परिसरात शोध मोहीम घेत जखमी, अडकलेल्या नागरिकांची तात्काळ सुटका करणे, इमारतीतून त्यांना बाहेर काढणे, त्यांच्यावर प्रथमोपचार करणे याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. हवाई हल्ल्यानंतर आग विझवण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येतील, हे ही यावेळी दाखवण्यात आलं. या मॉकड्रिलमध्ये पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ, बदलापूर नगरपालिका, महसूल विभागाने सहभाग घेतला होता. बदलापूरचे आमदार किसन कथोरे, प्रांत अधिकारी विजयानंद शर्मा, तहसीलदार अमित पुरी, पोलीस अधिकारी, महसूल अधिकारी सहभागी झाले होते.

भारतीय लष्कर आणि परराष्ट्रीय मंत्रालयाची संयुक्त पत्रकार परिषद सुरु

विंग कमांडर व्योमिका सिंग म्हणाल्या, तत्काळ आणि सुनियोजित प्रत्युत्तरात, भारतीय सशस्त्र दलांनी केवळ ओळखल्या जाणाऱ्या लष्करी लक्ष्यांवर अचूक हल्ले केले. पाकिस्तानने सतत चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला आहे ज्यामध्ये भारतीय एस-४०० प्रणाली, सुरतगड आणि सिरसा येथील हवाई तळ नष्ट केल्याचा दावा केला जात आहे. पाकिस्तानकडून प्रसारित केले जात असलेले हे खोटे दावे भारत स्पष्टपणे नाकारतो.

Pandharpur: पंढरपूरच्या टेंभुर्णीजवळ खासगी बस पेटली

पंढरपूर जवळच्या टेंभुर्णी येथे एका खासगी बसला अचानक आग लागली. आगीमध्ये बस जळून खाक झाली. सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झाली नाही.

खासगी बस हैदराबाद हून मुंबईकडे निघाली होती. आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बस टेंभुर्णी येथे आली असता बसला अचानक आग लागली.

प्रसंगावधान राखल्याने 15 प्रवाशी सुखरूप बाहेर पडले.

आगीत बसचे मोठं नुकसान झाले आहे.

शरद पवारबोलायचं नसतं डायरेक्ट ऍक्शन घ्यायची असते जालंधर ग्रामीणमधील एका गावात क्षेपणास्त्राचे भाग सापडले

जालंधर ग्रामीणमधील एका गावातील शेतात क्षेपणास्त्राचे भाग सापडले. पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

Ajit Doval: अजित डोवाल घेणार पंतप्रधान मोदींची भेट लाडघर समुद्रात टाँवर असलेलं अजस्त्र बार्ज

बॉम्बे हाय वरून निघालेली तेलाची रीग( बार्ज) हे रत्नागिरी येथील आंग्रेपोर्ट कडे चालले आहे.

लाडघर समुद्रात टाँवर असलेलं अजस्त्र बार्ज आंग्रेपोर्ट जाताना निदर्शनास आलं.

मात्र ग्रामस्थांना हे नेमकं कसले जहाज आहे याची उत्सुकता लागून राहिली होती. यासंदर्भात कस्टम विभागातील सूत्रांनी माहिती दिली आहे.

हे जहाज दुरुस्तीसाठी जयगड बंदरातल्या आंग्रे पोर्ट इथे चालले होते. त्यामुळे या जहाजापासून कुठलाही धोका नसल्याचे यंत्रणांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Gujrat: गुजरातमधील कच्छ सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या सशस्त्र ड्रोनला यशस्वीरित्या पाडले

गुजरातमधील कच्छ सेक्टरमध्ये भारतीय सैन्याने एल-७० एअर डिफेन्स गनचा वापर करून पाकिस्तानी सैन्याच्या सशस्त्र ड्रोनला यशस्वीरित्या पाडले आहे.

India Pakistan War: पंजाबच्या बर्नाला हवाईदळ तळाच्या परिसरात मोठा स्फोट

अग्निशमन दलाच्या गाड्या, रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल

याठिकाणी मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

शिक्रापुर तळेगाव महामार्गावर भिषण अपघात

- अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू...

- पीएमपीएल बस आणि दुचाकी चा झाला भिषण अपघात...

- रात्री उशीरा स्कुटी दुचाकी वरून तीन मित्र तळेगाव ढमढेरे कडे जात असताना समोरून येणाय्रा PMPML च्या बस ला जोरदार धडक बसून तीन जणांचा जागीच मृत्यू...

- अपघातात प्रथमेश शेलार,हर्षल घुमे,आयुष जाधव या तीघांचा झाला जागीच मृत्यू...

- या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा....!

रायगड जिल्ह्यातील पोलीस, महसूल यंत्रणा सतर्क

भारत-पाक सीमेवर दोन्ही देशामध्ये युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाली असून या पार्श्वभूमीवर रायगड पोलीस प्रशासन देखील सतर्क झाले आहे.

त्याअनुषंगाने सुरक्षेच्या विशेष उपाय योजना करण्यात आल्या आहेत. रायगड जिल्ह्यात पोलीस दलातर्फे युद्धजन्य परिस्थितीचे मॉकड्रिल राबवण्यात आले आहे.

अचानक होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यामध्ये कोणत्या प्रकारे कारवाई करणे आवश्यक आहे याचा अभ्यास करण्यात आला.

जिल्ह्यातील समुद्र किनारपट्टी सुरक्षा सक्रिय करण्यात आली असुन ठिकठिकाणी नाकाबंदी पॉईट लावण्यात आलेले आहेत.

अनोळखी बोट किंवा व्यक्ती दिसुन आल्यास तात्काळ हि माहिती कळविण्याबाबत सुचना मच्छीमार बांधवांना करण्यात आले आहे.

सद्य परिस्थितीत सतर्क राहावे, कोणत्याही परिस्थितीत घाबरून जावू नये. अफवा पसरवू नये किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन रायगड पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.

खामगाव शहरातील जवळपास भाविक २२ भाविक हे वैष्णोदेवी येथील कटरा येथे अडकले

खामगाव शहरातील जवळपास भाविक २२ भाविक हे वैष्णोदेवी येथे दर्शनासाठी गेले असता सध्या ते कटरा येथील एका खाजगी हॉटेलवर अडकले आहेत.

काल रात्री त्यांना रेल्वेने परत यायचं होतं.

मात्र कटऱ्याहून जम्मू पर्यंत ते पोहोचू शकले नाहीत त्यामुळे कटरा येथे एका खाजगी हॉटेल येथे अडकून पडले आहेत.

खामगाव परिसरातील २२ भावीक तर अकोला जिल्ह्यातील १८ भावीक अशी ४० भावीक कटरा येथे अडकून पडलेले आहेत. ज्यात १३ लहान मुलं आहेत.

शासणाने मदत करून अडकलेल्या भाविकांना जिल्ह्यात परत सुखरूप आणण्याची मागणी केली जात आहे.

Sharad Pawar: शरद पवार यांचा सांगोला दौरा रद्द

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आजचा सांगोला दौरा रद्द झाला आहे.

महत्वाची बैठक असल्याने तातडीने मुंबईला रवाना झाल्याची माहिती आहे.

शरद पवार आज सांगोला तालुक्यातील महूद येथील एका शेतकऱ्याच्या डाळिंब बागेची पाहणी करण्यासाठी सकाळी 10 वाजता येणार होते.

India Pakistan War: श्रीनगरमध्ये भारताने पाडले पाकिस्तानची २ विमाने

श्रीनगरमध्ये पाकिस्तान हवाई दलाची दोन विमानं पाडण्यात आली आहे. भारतीय लष्कराने ही मोठी कारवाई केली आहे.

पुन्हा एकदा भारताने पाकिस्तानची दोन विमानं पाडली आहेत. भारत सतत पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला करारा जबाब देत आहे चोख प्रत्युत्तर देत आहे.

भारतीय सैनाला ही विमानं पाडण्यात मोठं यश आलेलं आहे. भारत पाकिस्तानच्या प्रत्येक शस्त्र, प्रत्येक मिसाईल आणि ड्रोनला हवेतच नष्ट करुन टाकत आहे.

धाराशिव जिल्ह्यातील नागरीकांना उन्हाच्या झळा व उकाड्यापासून दिलासा

धाराशिव जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांच्या तापमानात तब्बल 5.7 अंश सेल्सियसची घट झाल्याने उन्हाच्या तिव्रतेत कमालीची घट झाली आहे.

याशिवाय राञी च्या वेळी किमान तापमान देखील 2.1 अंश सेल्सिअसने घटले आहे त्यामुळे नागरिकांना उन्हाच्या चटक्यासह उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

अवकाळीच्या वातावरणामुळे दुपारच्या उन्हाची ताप व रात्रीच्या उखड्यात कमालीची घट झाली आहे.अधून-मधून ढगाळ हवामान निर्माण होत असल्याने हवेत गारवा जाणू लागला आहे.

त्यामुळे काही दिवसांपासून हवेच्या उष्ण झळांनी बेजार झालेल्या नागरिकांचा त्रास कमी झाला असून अवकाळीच्या वातावरणामुळे दुपारच्या कमाल तापमानात सरासरीपेक्षा चार ते साडेपाच डिग्रीने घट झाली आहे.

ऊन कमी झाल्याने दुपारी घराबाहेर पडणे शक्य झाले आहे.त्यामुळे दुपारी रस्ते,बाजार पेठेमध्ये जाणवणारा शुकशुकाट दूर झाल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे.

India Pakistan War: काल रात्री फिरोजपूरमध्ये पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला

काल रात्री फिरोजपूरमधील एका निवासी भागात एका पाकिस्तानी ड्रोनने हल्ला केला आणि एका कुटुंबाला जखमी केले. कुटुंबाला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी कुटुंबाच्या घराबाहेरील दृश्ये समोर आली आहेत.

Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यात पोलीस सतर्क सागरी गस्तीला प्राधान्य

अवकाळी पावसामुळे शेवटच्या टप्प्यातील आंबा पिकाचे नुकसान

रत्नागिरीत आजपासून कृषी महोत्सव , तीन दिवस असणार हा कृषी महोत्सव

रत्नागिरी पोलिसांच्या सुट्ट्या रद्द , देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे रत्नागिरीतील पोलीस दल अलर्ट मोडवर

Unseasonal Rain: राज्यातील वादळी पावसाचे वातावरण कायम

मागील ३ दिवसांपासून काही ठिकाणी पडणाऱ्या पावसामुळे उन्हाचा चटकाही कमी झालेला दिसत आहे.

हवामान विभागाने राज्यातील काही ठिकाणी पुढील ५ दिवस वादळी पावसाचा इशारा दिला आहे.

३ दिवसांपासून विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी पाऊस काही ठिकाणी हजेरी त्यामुळे उन्हाळी पिकांसह फळपिकांचे नुकसान

पुढील ४ दिवस काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, धाराशिव, नांदेड आणि लातूर जिल्ह्यातही पुढील ४ दिवस काही ठिकाणी वादळी पावसाचा इशारा देण्यात आला.

मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि अहिल्यानगर तसेच नाशिक जिल्ह्यातही पावसाला पोषक हवामान आहे.

Pune International Airport: पुणे विमानतळावरील सलग तिसऱ्या दिवशी उड्डाण तात्पुरती स्थगित

आज इंडिगो आणि स्पाइस जेट या कंपन्यांचे 9 उड्डाण रद्द

याबाबत संबंधित प्रवाशांना विमानतळ प्रशासन आणि विमान कंपन्यांकडून वेळेवर माहिती देण्यात आली आहे. या प्रवाशांना पूर्ण परतावा किंवा पर्यायी प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली.

रद्द झालेली उड्डाणे

इंडिगो एअरलाइन्स : अमृतसर- पुणे, चंडीगड- पुणे, पुणे- चंडीगड, पुणे- अमृतसर, नागपूर-पुणे, पुणे- जोधपूर, जोधपूर- पुणे.

Jayakwadi Dam: जायकवाडी धरणावरील पर्यटन पुढील चार दिवस बंद, अलर्ट जारी

देशात निर्माण झालेल्या युद्धाच्या परिस्थितीमुळे जायकवाडी धरणावरील पर्यटन पुढील चार दिवस बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे.

पुढील चार दिवस जायकवाडी धरणाच्या परिसरामध्ये अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.

तर प्रशासनाच्या वतीने जायकवाडी धरणावर सायनाचे सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आले आहे.

आशिया खंडातील मातीचे धरण म्हणून जायकवाडी धरण हे ओळखलं जातं, मागील चार दिवसांपूर्वी या ठिकाणी एसटीआयच्या पथकाने देखील भेट दिली होती.

जायकवाडी धरणावरती छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी,पोलिस अधीक्षक डॉ विनयकुमार राठोड, उप जिल्हाधिकारी निलम बाफना,तहसीलदार दिनेश झांपले यांनी धरण सुरक्षेबाबत आढावा घेऊन काही महत्त्वपूर्ण सुचना दिल्या.

Konkan Rain: कोकणात सध्या अवकाळी पावसाचा खेळ सुरु

कोकणात सध्या अवकाळी पावसाचा खेळ सुरु आहे..

या अवकाळी पावसामुळे उष्याने हैराण झालेल्या नागरीकांना थोडा गारवा मिळालाय मात्र या पावसामुळे सर्वाधिक आनंद झालाय तो मोराला....

साखरप्यातील पुर्ये गावात मोर दिसलाय हा मोर पावसाचा आनंद घेत पिसारा फुलवून नाचताना दिसतोय..

मोरांचा थवाच या गावात पहायला मिळाला...

राष्ट्रीय पक्षी असेला हा मोर कोकणात दुर्मिळच पहायला मिळतो.

त्याच पावसात पिसारा फुलवून मोराच नृत्य आणखीनत दुर्मिळ...हा अद्भूत नजारा मोबाईल मध्ये कैद झालाय...

Shirpur: शिरपूर येथे दोन ठिकाणी वरली मटका अड्ड्यावर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकांचा छापा

वाशिमच्या शिरपूर येथे दोन ठिकाणी सुरू असलेल्या वरली मटका अड्ड्यावर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकत कारवाई केलीये. या कारवाईत २६ आरोपींवर गुन्हा दाखल केला असून, २ लाख ९७ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन ठिकाणी मारलेल्या छाप्यात ३१,२८० रुपयांच्या रोख रकमेसह १७ मोबाइल फोन्स (किंमत १.७१ लाख), दुचाकी वाहने असा एकूण २.९७लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

शिवसेनेचा ट्रॅक्टर मोर्चा स्थगित, कर्जमाफीसाठी निघणार होता मोर्चा

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

सध्या भारत पाकिस्तान दरम्यान युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने राष्ट्रीय भावनेतून शिवसेना ठाकरे पक्षाने मोर्चा स्थगित केल्याची जाहीर केले असून हा ट्रॅक्टर मोर्चा यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार होता.

मोर्चाचे नेतृत्व खासदार अरविंद सावंत, खासदार संजय देशमुख, खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वात करण्यात आला होते.

प्रशासनावर ताण येऊ नये या दृष्टिकोनातून ट्रॅक्टर मोर्चा रद्द केल्याचे शिवसेना ठाकरे च्या वतीने जाहीर करण्यात आले.

यवतमाळ जिल्ह्यातील कृषी केंद्राची तपासणी

खरीप हंगामाच्या दृष्टीने गुणवत्ता नियंत्रण पथकाने ॲक्शन प्लॅन तयार केला असून यवतमाळ जिल्ह्यातील चार हजार कृषी सेवा केंद्राचे परवाने व इतर नोंदणी केलेले बियाणे, कीटकनाशक खताची तपासणी केली जाणार आहे. खरीप हंगामापूर्वी गुणवत्ता विभागाने तपासणी मोहिमेचा निर्णय घेतलाय त्या अनुषंगाने येत्या काही दिवसात ही मोहीम यवतमाळ जिल्हाभरात राबवली जाणार असून प्रत्येक कृषी सेवा केंद्राची तपासणी या मोहिमेच्या माध्यमातून केली जाणार आहे.

ढोकी येथुन गावठी कट्ट्यासह एकाला ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील तेरणा कारखाना समोरील पारधी पिढी येथुन एकाला गावठी कट्ट्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत कारवाई केली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या मिळालेल्या माहितीनुसार एका विधी संघर्षग्रस्त बालकाकडे गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी पंचासमक्ष पाहणी करुन विचारणा केली असता सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली

माञ अधिक विश्वासात घेवुन विचारणा केली असता गावठी कट्टा घरात लपवुन ठेवण्याची माहिती दिली त्यानुसार पोलिसांनी 15 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा जप्त जप्त केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.