टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने काही दिवसांपूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. रोहित शर्माने एकाएकी टेस्ट क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. रोहितने टी 20i नंतर आता टेस्ट फॉर्मटेमध्येलाही रामराम केला आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना रोहितला आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळतानाच पाहायला मिळणार आहे. तर दुसऱ्या बाजूला नेपाळ क्रिकेट बोर्डाने स्कॉटलंडमध्ये होणाऱ्या आगामी आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग 2 या (ICC Cricket World Cup Series League 2) स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. रोहित पौडेल हा नेपाळचं नेतृत्व करणार आहे. तसेच या संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी दीपेंद्र सिंग आयरी याला देण्यात आली आहे. नेपाळ क्रिकेटने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती दिली आहे.
फास्टर बॉलर नंदन यादव याला एकदिवसीय संघात स्थान देण्यात आलं आहे. नंदनची एकदिवसीय संघात निवड होण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. नंदनच्या समावेशामुळे नेपाळच्या बॉलिंगची ताकद वाढली आहे. नंदनमुळे आता एकूण 5 बॉलर झाले आहेत. यामध्ये करण केसी, गुलशन झा, रिजान ढकाल आणि सोमपाल कामी यांचाही समावेश आहे. तर ऑलराउंडर बसीर अहमद हा आपलं स्थान कायम ठेवण्यात यशस्वी ठरला आहे.
नेपाळ टीम स्कॉटलँड दौऱ्याआधी इंग्लंडमध्ये सराव सामने खेळणार आहे. नेपाळ क्रिकेट टीम 16 ते 31 मे दरम्यान 6 सराव सामने खेळणार आहे. तसेच नेपाळ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग 2 स्पर्धेत नेदरलँड्स आणि स्कॉटलँड विरुद्ध प्रत्येकी 2-2 सामने खेळणार आहे. तसेच नेपाळ टीम लीग 2 स्पर्धेनंत टी 20 ट्राय सीरिजसाठी स्कॉटलँडमध्ये थांबणार आहे.
नेपाळ क्रिकेट संघाची घोषणा, रोहित कर्णधार
नेपाळ क्रिकेट टीम : रोहित पौडेल (कर्णधार), आसिफ शेख, कुशल भुरटेल, अनिल कुमार साह, भीम शार्की, आरिफ शेख, बसीर अहमद, गुलशन कुमार झा, दीपेंद्र सिंग आयरी, संदीप लामिछाने, सोमपाल कामी, करण केसी, ललित नारायण राजबंशी, नंदन यादव आणि रिजन ढकल.