आजचे पंचांग आणि दिनविशेष - 11 मे 2025
esakal May 11, 2025 11:45 AM
पंचांग ११ मे २०२५ साठी

रविवार : वैशाख शुद्ध १४, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ, सूर्योदय ५.४८, सूर्यास्त ६.५७, चंद्रोदय सायंकाळी ५.५८, चंद्रास्त पहाटे ५.१२, श्रीनृसिंह जयंती, पौर्णिमा प्रारंभ रा. ८.०२, भारतीय सौर वैशाख २१ शके १९४७.

दिनविशेष
  • १९९८ : २४ वर्षांनंतर भारताने पुन्हा राजस्थानच्या वाळवंटातील पोखरणच्याच परिसरात हायड्रोजन बॉम्बनिर्मितीसाठीच्या साधनांसह तीन यशस्वी आण्विक चाचण्या घेतल्या.

  • १९९९ : टेनिसची सम्राज्ञी स्टेफी ग्राफ हिने जर्मन खुल्या टेनिस स्पर्धेत आपल्या कारकिर्दीतील एक हजारावा सामना खेळण्याचा एक वेगळा विक्रम केला.

  • २०१० : जगज्जेत्या विश्वनाथन आनंदने आपला उच्च दर्जा सिद्ध करीत जागतिक बुद्धिबळाचे विजेतेपद राखले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.