सिंदेवाही (जि.चंद्रपूर) : तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या तीन महिलांना वाघिणीने हल्ला करून ठार केले. ही घटना शनिवारी दुपार सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील मेंढा (माल) जंगल परिसरात सुमारास घडली.
शुभांगी मनोज चौधरी (वय ३८), कांताबाई बुधा चौधरी (वय ६०) आणि रेखा शालिक शेंडे (वय ४८, तिन्ही रा. मेंढा माल) अशी मृत महिलांची नावे आहेत. दुसऱ्या एक घटनेत वंदना विनायक गजभिये (वय ५० रा. चारगाव बडगे) या महिलेला वाघाने हल्ला करून जखमी केले.