'सीआयडी' सध्या चांगलेच चर्चेत आहे. 'सीआयडी' चे कलाकार प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहेत. 'सीआयडी'चा दुसरा (CID 2) सीझन देखील प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे. अलिकडेच या शोमध्ये अभिनेता पार्थ समथानची (Parth Samthaan ) एन्ट्री झाली होती. तर एसीपी प्रद्युम्न म्हणजे शिवाजी साटम ( Shivaji Satam As ACP Pradyuman) यांची एक्झिट झाली. मात्र आता या शोमधून अजून एक कलाकाराची एक्झिट होणार आहे. याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.
'' शोमध्ये पार्थ समथान एसीपी आयुष्मानच्या भूमिकेत पाहायला मिळाला. मात्र शिवाजी साटम यांच्या एक्झिटमुळे 'सीआयडी'च्या टिआरपीमध्ये परिणाम झालेला पाहायला मिळाला. मीडिया रिपोर्टनुसार, आता मात्र 'सीआयडी 2'मधून पार्थ समथान हा निरोप घेणार आहे. त्याची मालिकेतून लवकरच एक्झिट होणार आहे. यावर पार्थ समथान काय म्हणाला जाणून घेऊयात.
एका मिडिया मुलाखतीत म्हणाला की, 'सीआयडी'मध्ये साटम एसीपी प्रद्युम्न पुन्हा परतणार आहेत. त्यामुळे मी सीआयडीचा निरोप घेणार आहे. 'सीआयडी' मधील पार्थ समथान याच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले. त्याचा अभिनय चाहत्यांना खूपच आवडला. पार्थ शो सोडण्यामागचे दुसरे कारण म्हणजे, त्याची इतर राहिलेली कामे त्याला वेळेत पूर्ण करायची आहेत.
मुलाखतीत पार्थने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. तो म्हणाला," माझ्या इतर कामांमुळे मी शोमध्ये जास्त काळ राहू शकलो नाही. पण प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम आणि पाठिंबा मिळाला. त्याचे खूप आभार..." मीडिया रिपोर्टनुसार,पार्थ समथान काही भागांसाठीच 'सीआयडी 2' मध्ये आला होता. पार्थ समथानने'बेस्ट फ्रेंड्स फॉरएवर' या मालिकेतून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 'कैसी ये यारियां' या मालिकेमुळे त्याला खूप लोकप्रियता मिळाली.
सीआयडीचे एसीपी प्रद्युमन, इन्स्पेक्टर अभिजीत आणि इन्स्पेक्टर दया हे त्रिकूट पाहायला चाहत्यांना खूप आवडते. सीआयडी या शोने 2018 मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. सीआडीने तब्बल 20 वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. 21 डिसेंबर 2024पासून 'सीआयडी २' प्रेक्षकांच्या भेटीला आले.