भारत-पाकिस्तान तणावाचा सर्व क्षेत्रातील लोकांवर परिणाम झाला आहे.सामान्यांपासून ते कलाकारांपर्यंत प्रत्येकजण यावर आपली भूमिका ठामपणे मांडत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता 'सनम तेरी कसम'चा सुपरस्टार बॉलिवूड अभिनेता हर्षवर्धन राणे (Harshvardhan Rane) याने मोठा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून त्याने ही बातमी चाहत्यांना सांगितली आहे.
'ऑपरेशन ' (Operation Sindoor) नंतर अभिनेता राणे याने पाकिस्तानी कलाकारांसोबत काम न करण्याची शपथ घेतली आहे. त्यामुळे त्याने 'सनम तेरी कसम 2' (Sanam Teri Kasam Part 2) काम करण्यास नकार दिला आहे. हर्षवर्धन याने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करून ही माहिती दिली आहे. यामुळे सोशल मीडियावर सर्वत्र हर्षवर्धन राणेची चर्चा पाहायला मिळत आहे.
हर्षवर्धन राणे स्टोरी"सनम तेरी कसम या चित्रपटाने दिलेल्या या अनुभवाबद्दल मी आभारी आहे.पण सध्याची परिस्थिती पाहून आणि माझ्या देशावर केलेल्या टिका वाचल्यानंतरव मी ठरवले आहे की जर जुने कलाकार पुन्हा चित्रपटात सामील होणार असतील तर मी 'तेरी कसम 2'चा भाग होण्यास नकार देईन."
भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळात पाकिस्तानी कलाकारांनी 'ऑपरेशन सिंदूर'वर अनेक टिका केल्या आहेत. 'सनम तेरी कसम' या चित्रपटात हर्षवर्धनसोबत काम करणा अभिनेत्री देखील पाकिस्तानी आहे. अभिनेत्री मावराने ( Mawra Hocane ) देखील भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्य आणि कृतीवर नाराजी व्यक्त केली. तिने लिहिलं की, "ऑपरेशन सिंदूरमुळे निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले."
हर्षवर्धन आणि मावराचा 'सनम तेरी कसम' हा चित्रपट 2016 ला प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर 2025 ला चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात आला. तेव्हा चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळाले आहे. तेव्हा चित्रपट निर्माते दीपक मुकुट यांनी 'सनम तेरी कसम 2' ची घोषणा केली.