बागकाम करणे अनेकांचा छंद असतो. झाडांमुळे हवा खेळती राहते, ऑक्सीजनचा पुरवठा होतो शिवाय घराची शोभा देखील वाढते. पण, घरासभोवताली जागा कमी असल्याने आवड असूनही झाडांची लागवड करता येत नाही. अशावेळी खिडकी, बाल्कनीत विविध झाडे लावण्यात येतात. मुंबईसारख्या शहरात झाडे लावण्यासाठी घरामध्ये किंवा घराभोवती झाडे लावणे जरा मुश्किलच दिसते. अशावेळी घराला जर टेरेस असेल तर तेथे झाडे लावली जातात. पण, टेरेस नसेल तर.. अशावेळी तुम्ही घरामध्येच कमी जागेत फुलणारी झाडे लावायला हवीत. आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात, कमी जागेत लावता येतील अशी फुलझाडे,
विविध प्रकारची जास्वंद तुम्हाला खिडकीत लावता येतील. जास्वंद कमी जागेत लावता येणारी वनस्पती आहे.
सदाफुली विविध रंगात आढळणारी वनस्पती आहे. छोट्याशा कुंडितही सदाफुली फुले देऊ शकते.
कमी जागेत चमेलीची फुले वाढतात. चमेलीची फुले खूपच सुंदर असतात.
लिली आकर्षक वनस्पती आहे. बाल्कनीमध्ये तुम्ही हे रोप लावू शकता.
मोगरा बाल्कनीत उगवणारी वनस्पती आहे. तुम्हाला फक्त वेळोवेळी मोगऱ्याला पाणी द्यायचे आहे.
अनंताचे झाड ही अंगणात येणारी वनस्पती आहे. पण, तुम्ही बाल्कनीत सुद्धा ही वनस्पती लावू शकता.
जुईच्या फुलाची वेल कमी जागेत उगवते.
बटण गुलाब दिसायला फार सुंदर असतो. एकदा फुलला ही त्याला भरपूर फुले येतात.
हेही पाहा –