पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगप्रकरणी ऑर्थोपेडिक्स विभागातील तीन द्वितीय वर्ष निवासी डॉक्टरांवर प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
Pune Live : पुणे शहरात कार्यक्रमांदरम्यान आकाशात बीम वा लेझर प्रकाशझोत सोडण्यास दोन महिन्यांसाठी बंदीयुद्धजन्य परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे.आदेश मोडणाऱ्यांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ अंतर्गत कारवाई होईल, अशी पोलिसांनी माहिती दिली.
Rahul Gandhi Live : राहुल गांधी यांचा जामीन रद्द करा – सात्यकी सावरकर यांचे न्यायालयात निवेदनस्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील कथित बदनामीप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात राहुल गांधी वारंवार तारखा मागत असल्याने त्यांचा जामीन रद्द करावा, अशी मागणी सात्यकी सावरकर यांचे वकील संग्राम कोल्हटकर यांनी न्यायालयात केली आहे
Pune Live : जम्मू आणि राजस्थान जाणाऱ्या रेल्वे गाड्या वेळापत्रकानुसार धावणार1. गाडी क्रमांक 20495 जोधपूर - हडपसर एक्सप्रेस
2. गाडी क्रमांक 20496 हडपसर - जोधपूर एक्सप्रेस
3. गाडी क्रमांक 11077 पुणे - जम्मू तवी एक्सप्रेस
4. गाडी क्रमांक 11078 जम्मू तवी - पुणे एक्सप्रेस
2025/05/05 मध्ये ज्या गाड्यांचे रद्द/अपूर्ण संचालन (शॉर्ट टर्मिनेशन/शॉर्ट ओरिजिनेशन) करण्यात आले होते, त्या सर्व गाड्या आता नियत वेळापत्रकानुसार पुन्हा सुरू राहतील.
Seize Fire Live : सीमेलगतच्या राज्यांत हळूहळू परिस्थिती पूर्वपदावरपाकिस्तानने युद्धविरामाचे उल्लंघन केल्यानंतर भारताने चोख प्रत्युत्तर दिले, मात्र आज सकाळपासून सीमेलगतच्या जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थानमध्ये परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. कुठेही ड्रोन हल्ला किंवा गोळीबाराची घटना समोर आलेली नाही.