20 व्या शतकातील पहिलं तिहेरी शतक ठोकणाऱ्या दिग्गज क्रिकेटपटूचं निधन, 27 व्या वर्षी घेतला होता संन्यास
GH News May 11, 2025 05:07 PM

ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटी क्रिकेटपटू बॉब काउपर यांचं वयाच्या 84 व्या वर्षी निधन झालं आहे. आज शनिवारी सकाळी त्यांनी मेलबर्न येथे अंतिम श्वास घेतला. काउपर गेल्या काही वर्षापासून कॅन्सरने पीडित होते. आज अखेर कर्करोगाशी त्यांची झुंज थांबली. ऑस्ट्रेलियात टेस्टमध्ये पहिलं तिहेरी शतक ठोकण्याचा विक्रम काउपर यांच्या नावार आहे. त्यांनी 27 कसोटी सामन्यात 46.84च्या सरासरीने 2061 धावा केल्या होत्या. काउपर यांनी 1966 मध्ये मेलबर्न येथे इंग्लंडच्या विरोधातील कसोटीत 307 धावा केल्या होत्या. त्यांची ही अविस्मरणीय खेळी संस्मरणीय ठरली. त्यानंतरही त्यांनी अनेक विक्रम प्रस्थापित केले होते.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बॉब काउपर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. काउपर हे अत्यंत प्रतिभावंत डावखुरे फलंदाज होते. शानदार स्ट्रोक प्ले, क्रीजवरील धैर्य आणि मोठा स्कोअर करण्याची त्यांची क्षमता वाखाणण्यासारखी होती. काउपर यांनी व्हिक्टोरियासाठी सर्वाधिक प्रथम श्रेणी सामने खेळले. यावेळी त्यांनी 147 सामन्यात 10,595 धावा ठोकल्या आणि 183 बळी टिपले होते. वाचा: मोठी बातमी! टेस्ट टीमचा नवा कर्णधार ठरला… गंभीर-अगरकरच्या मनात काय? ‘या’ तारखेला होणार घोषणा

घरच्या मैदानावरचा राजा

बॉब काउपलर यांनी 307 धावा ठोकल्या होत्या. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवरील टेस्टमधील हे पहिलं तिहेरी शतक होतं. तसंच 20 व्या शतकातील पहिलंवहिलं तिहेरी शतक होतं. काउपर हे घरच्या मैदानावरचे राजा होता. त्यांनी घरच्या मैदानावर सर्वाधिक रेकॉर्ड केले. 75.78च्या सरासरीने त्यांनी घरच्या मैदानावर धावा केल्या आहेत. तर विदेशी भूमीवर त्यांनी 33.33 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. घरच्या आणि विदेशी भूमीतील त्यांच्या बॅटिंगच्या सरासरीत 42.45 चं अंतर आहे. हा सुद्धा एक विक्रमच आहे. महान क्रिकेटर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर घरच्या मैदानावर सर्वाधिक टेस्ट सरासरी असलेले ते फलंदाज आहेत. ब्रॅडमन यांच्या नावावर दोन तिहेरी शतक आहेत. पण त्यांनी दोन्ही शतके हे विदेशी भूमीवर ठोकले आहेत.

27 व्या वर्षीच संन्यास

काउपर यांनी 1968मध्ये क्रिकेटला अलविदा केलं होतं. त्यावेळी त्यांचं वय अवघं 27 वर्ष होतं. क्रिकेट सोडल्यानंतर त्यांनी बिझनेसवर फोकस केला होता. विशेष म्हणजे बिझनेसवर फोकस करण्यासाठीच त्यांनी क्रिकेट सोडलं होतं. क्रिकेट सोडल्यानंतर ते बिझनेसमध्येही यशस्वी ठरले. त्याशिवाय त्यांनी क्रिकेट रेफरी म्हणूनही काम केलं आहे. दोन टेस्ट आणि 14 वनडेत ते रेफरी होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.