इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा 18 वा हंगाम मध्येच स्थगित करण्यात आला, पण आता स्पर्धा पुन्हा 15-16 मे रोजी सुरू केली जाणार आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलिया खेळाडूंसंबंधित मोठी अपडेट समोर येत आहे. ते आता उर्वरित स्पर्धेसाठी भारतात परतणार नाहीत. जोश हेजलवुड आणि मिचेल स्टार्क यांच्या विषयी मोठी अपडेट समोर येत आहे. जाणून घ्या की, ऑस्ट्रेलियातील कोणकोणते खेळाडू उर्वरित स्पर्धेसाठी भारतात परततील आणि कोणते येणार नाहीत.
पहिल्या ट्रॉफीसाठी या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघ सुरुवातीपासूनच शानदार प्रदर्शन करत आहे. ऑस्ट्रेलिया गोलंदाज जोश हेजलवूडने यामध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. पण आता त्याचं पुन्हा भारतात येणं अवघड वाटत आहे. त्याच्या खांद्यामध्ये दुखत असल्याने मागचा सामना तो खेळू शकला नव्हता. तो आयपीएल स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच या दुखापतीने ग्रस्त आहे.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफी नंतर तो चॅम्पियन्स ट्रॉफीमधून देखील बाहेर गेला होता. रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येत आहे की, जूनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळणे पक्के आहे. यासाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशन त्याच्याविषयी चिंतेत नाही. जर आयपीएल सुरू झाली तर हेजलवूड बाहेर राहू शकतो. पण याचा मोठा फटका आरसीबीला बसणार असल्याची शक्यता आहे.
आयपीएल स्थगित केल्यानंतर स्टार्क त्याच्या देशात परत गेला होता. त्यानंतर त्याने कोणत्याही मीडिया प्लॅटफॉर्मशी बातचीत केली नाही. त्याच्यासोबत त्याची पत्नी देखील होती. नाईन न्यूजने त्यांच्या न्यूजमध्ये स्टार्कच्या मॅनेजरशी बातचीत केल्यानंतर सांगितले आहे की, तो भारतात परतणार नाही. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सला देखील मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. कारण त्याने स्पर्धेत आत्तापर्यंत कमालीचे प्रदर्शन केले आहे.
ऑस्ट्रेलियाचे काही असे खेळाडू आहेत, ज्यांचे भारतात येणे अवघड आहे. यासाठी दुखापत हे एकच कारण नाही. पॅट कमिन्स हैदराबादचा कर्णधार आहे. हैदराबाद आधीच प्लेऑफच्या रेसमधून बाहेर पडला आहे. त्यामुळे त्याने भारतात परतण्याचा संबंधच उरत नाही. अशातच ट्रेव्हिस हेड सुद्धा आहे. तो सुद्धा हैदराबाद संघाचा खेळाडू आहे. त्यामुळे तोही भारतात परतेल की नाही, यावर प्रश्नचिन्ह आहे. नाथन एलीस चेन्नई सुपर किंग्स संघात सामील आहे चेन्नई प्लेऑफ मधून बाहेर पडणारी पहिली टीम ठरली होती. त्यामुळे तो देखील भारतात येईल का हे सांगता येणे अवघड आहे.
याशिवाय ऑस्ट्रेलियातील अनेक असे खेळाडू आहेत ज्यांचे संघ अजूनही प्लेऑफच्या रेसमध्ये टिकून आहेत. अजून एकही संघ प्लेऑफमध्ये पोहोचलेला नाही.
प्लेऑफमध्ये टिकून राहण्याच्या रेसमध्ये अजूनही सामील खेळाडूंमध्ये मिचेल स्टार्क, जॅक फ्रेसर मॅकगर्क, स्पेंसर जॉन्सन, मिशेल मार्श, जोश हेजलवूड, टीम डेविड, मार्कस स्टॉयनीस, मीच ओवेन, जोश इंग्लिश, आरोन हार्डी, जेवियर बार्टलेट सामील आहेत.