आज सोन्याचे दर: भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबल्यानंतर सोन्याच्या दरात मोठे चढउतार दिसत आहेत. गेल्या 48 तासांत सोन्याचा भाव तब्बल 8000 रुपयांनी घसरला आहे. भारत पकिस्तान युद्धानंतर 4000 रुपयांनी घसरलेले सोने सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा 4000 रुपयांनी खाली आले. रविवारी(11 मे) 96 हजार 710 रुपयांवर आलेल्या सोन्याचा भाव आता आणखी 4 हजार रुपयांनी घसरलाय. आता प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव 92 हजार 910 रुपयांवर आला आहे. (Gold Rate)
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अमेरिका चीनच्या टॅरीफ कराच्या चर्चेनंतर सोन्याच्या किमतींवर परिणाम होत असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, सोन्याच्या भावाने गेल्या आठवड्यात लाखांच्या घरात मुसंडी मारल्यामुळे ग्राहकांमध्ये सोने खरेदीबाबत साशंकता दिसून आली. गेल्या दोन दिवसांचे उतरते भाव पाहता अनेकजण पुन्हा सोने खरेदीचा विचार करू लागले आहेत.
इंडियन बुलियन ज्वेलर असोसिएशनच्या आजच्या आकडेवारीनुसार, 12 मे रोजी, मुंबईपुण्याच्या सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 92 हजार 710 एवढी झालीय. तर 22 कॅरेट सोन्याला प्रति 10 ग्रॅम 85,287 रुपयांचा भाव सुरु आहे. गेल्या आठवड्यात 1 लाख 500 रुपये असणाऱ्या सोन्याचा भाव रविवारी 96,710 रुपयांवर आला. तर सोमवारी तो आणखी 4000 रुपयांनी घसरला असून प्रति 10 ग्रॅम सोन्यामागे 92 910- 93010 रुपये भाव झाला आहे. दरम्यान, सोन्याच्या भावात काहीसा चढउतार सुरु असल्याने अनेकजण सोनेखरेदीबाबत वेट ॲन्ड वॉचच्या भूमिकेत असल्याचं दिसत आहे.
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणानंतर संपूर्ण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खळबळ उडाली. जगभरातील शेअरमार्केट गडगडल्यानंतर सोन्याच्या भावाने आतापर्यंतचा सर्वाधिक भाव गाठला. देशांतर्गत सोन्याच्या किमतीही वाढल्या. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी संघर्षाला सुरुवात झाली.
हेही वाचा:
दिलासादायक! 48 तासात सोन्याच्या दरात 2 हजार रुपयांची घसरण, सध्या सोन्याचा दर काय?
अधिक पाहा..