भारत आणि पाकिस्तानात सध्या तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. एकीकडे भारत आणि पाकिस्तानात युद्धसदृश्य परिस्थिती असताना दुसरीकडे निसर्गही पाकिस्तानवर कोपल्याचे पाहायला मिळत आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. याची तीव्रता ४.६ रिस्टेल स्केल इतकी होती. गेल्या आठवड्याभरात पाकिस्तानमध्ये तिसऱ्यांदा भूकंप आला आहे. त्यामुळे पाकिस्तानला आणखी एक मोठा हादरा बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्याची तीव्रता 4.6 रिस्टेल स्केल इतकी होती. तर खोली 10 किलोमीटर असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे गेल्या एका आठवड्यात पाकिस्तानमध्ये तिसऱ्यांदा भूकंपाचा धक्का बसला आहे. यापूर्वी सोमवारी (5 मे) पाकिस्तानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला होता. त्यावेळी भूकंपाची तीव्रता 4.2 इतकी नोंदवण्यात आली होती. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार, हा भूकंप जमिनीपासून केवळ 10 किलोमीटरवर झाला होता. त्यामुळे भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले होते.
पाकिस्तानमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने भूकंप येत आहेत. हे सर्व भूकंप 70 किलोमीटरपेक्षा कमी खोल होते. त्यामुळे या भूकंपामुळे अधिक प्रमाणात नुकसान होते. जमिनीपासून केवळ १० किलोमीटर खाली भूकंपीय लहरी जाणवतात. त्यामुळे भूकंपाचे केंद्र बिंदू असलेल्या ठिकाणी तीव्र कंपने जाणवतात. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते.
पाकिस्तानातील बलुचिस्तान हे एक केंद्रशासित क्षेत्र आहे. खैबर पख्तूनख्वा आणि गिलगिट-बाल्टिस्तान हे प्रांत इराणी पठारावरील युरेशियन प्लेटच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर वसलेले आहेत. तर सिंध, पंजाब आणि पाकिस्तानच्या ताब्यात असलेला जम्मू आणि काश्मीर प्रांत दक्षिण आशियामध्ये भारतीय प्लेटच्या उत्तर-पश्चिम टोकाला आहे. यामुळे, हा संपूर्ण प्रदेश भूकंपांसाठी संवेदनशील मानला जातो. कारण येथे दोन टेक्टोनिक प्लेट्स एकमेकांना धडकतात.