विराट कोहलीने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर केली आहे. विराट कोहलीने वयाच्या 36व्या वर्षी कसोटी क्रिकेटला रामराम ठोकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कारण विराट कोहलीच्या फिटनेसबाबत काहीचं चिंता नव्हती. त्यामुळे रोहित शर्मा पाठोपाठ त्याने निवृत्ती घेतल्याने आश्चर्य वाटत आहे. असं अचानक निवृत्ती घेण्याचं कारण काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण पुढच्या महिन्यात टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे त्याच्या निवृत्तीने खळबळ उडाली आहे. त्याच्या निवृत्तीमागे काहीतरी गडबड असल्याचं त्याच्या चाहत्यांना वाटत आहे. अनेकांनी याबाबत आपल्या तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. दिल्ली रणजी संघाचे मुख्य प्रशिक्षक सरनदीप सिंग यांनीही याबाबत धक्कादायक विधान केलं आहे. त्यांच्या मते, विराट कोहलीच्या डोक्यात निवृत्तीचा विचार नव्हता, त्याचे संपूर्ण लक्ष इंग्लंड मालिकेवर होतं. सरनदीप सिंग यांच्या विधानाने क्रीडाविश्वात वेगळ्याच चर्चांना उधाण आलं आहे. कारण विराट कोहली या वर्षाच्या सुरुवातील रणजी सामना खेळण्यास दिल्लीला आला होता. त्याने सरनदीप सिंग यांच्यासोबत बराच वेळ व्यत्त केला होता.
सरनदीप सिंग यांनी स्टार स्पोर्टशी बोलताना सांगितलं की, ‘काही आठवड्यांपूर्वी मी विराट कोहलीशी बोललो आणि इंग्लंड मालिकेची तयारी करण्यासाठी काउंटी क्रिकेट खेळेल का? असं विचारलं. तेव्हा विराट कोहली म्हणाला होता की, इंग्लंडमध्ये भारत अ संघासाठी दोन सामने खेळेन.’ सरनदीप सिंग यांच्या वक्तव्यानुसार विराट कोहली इंग्लंड दौऱ्याची तयारी करत होता, असं दिसत आहे. सरनदीप सिंग यांच्या मते, विराटने कसोटी फॉरमेट सोडण्याची जराही इच्छा व्यक्त केली नव्हती. उलट इंग्लंड मालिकेसाठी तयारी करत होता.
सरनदीप सिंग पुढे म्हणाले की, ‘विराट कोहलीने मला सांगितलं होतं की इंग्लंड मालिकेत 4-5 शतकं करायची आहेत. जसं मी 2018 मध्ये केलं होतं. तेव्हा रणजी सामने खेळण्यासाठी आला होता.’ इतकंच काय तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात फक्त एकच शतक केल्याने विराट कोहली निराश होता, असंही त्यांनी पुढे सांगितलं. रणजी स्पर्धेवेळी विराट फक्त इंग्लंड कसोटी मालिकेबाबत चर्चा करायचं असं देखील त्यांनी सांगितलं. सरनदीप सिंगच्या यांच्या वक्तव्याचे अनेक अर्थ काढले जात आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर विराट कोहलीचे चाहते या निवृत्तीवर संशय व्यक्त करत आहेत.
दुसरीकडे, विराट कोहलीने आरसीबी पॉडकास्टला एक मुलाखात दिली होती. त्यात त्याने आपल्या निवृत्तीवर भाष्य केलं होतं. त्याने सांगितलं होतं की, ‘घाबरू नका,मी काहीच घोषणा करणार नाही. आतापर्यंत सर्व काही ठीक आहे. मला अजूनही खेळायला आवडतं.’ इतकंच काय तर मोठे काही करण्याचा मनात जराही विचार नाही. फक्त क्रिकेट आनंद घेऊन खेळायचं आहे.