बारावीची पुरवणी परीक्षा जून-जुलैमध्ये होणार
Webdunia Marathi May 12, 2025 02:45 PM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ जून-जुलैमध्ये बारावीची पुरवणी परीक्षा घेणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. नियमित शुल्कासह 17 मे पर्यंत आणि विलंब शुल्कासह 18 ते 22 मे पर्यंत अर्ज सादर करता येतील. ही माहिती मंडळाच्या एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली.

ALSO READ:

राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली.दिलेल्या माहितीनुसार, पुनर्परीक्षार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत परीक्षा देणारे विद्यार्थी ,खासगी विद्यार्थी, आयटीआयचे विद्यार्थी यांना पुरवणी परीक्षा देता येणार आहे. या साठी त्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाईन अर्ज भरताना फेब्रुवारी -मार्च 2025 च्या परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना परीक्षेची माहिती ऑनलाईन अर्जात घेता येईल. श्रेणी किंवा गुणसुधार योजनेअंतर्गत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना तीन संधी उपलब्ध असणार आहे

ALSO READ:

अर्ज भरल्यावर महाविद्यालयांनी 23 मे रोजी शुल्काची रकम विभागीय मंडळाकडे

जमा करायची आहे. तर विद्यार्थ्यांना प्रिलिस्ट आणि याद्या 26 मे रोजी जमा करण्याचे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे. .नियमित आणि विलंब शुल्काद्वारे अर्ज भरण्यास मुदतवाढ देणार नसल्याचे राज्य मंडळाने सांगितले आहे.

Edited By - Priya Dixit

ALSO READ:


© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.