मालवणीत गटारे तुंबून घाण पाणी दारात
esakal May 12, 2025 10:45 PM

मालवणीत गटारे तुंबून घाण पाणी दारात
मालाड, ता. १२ (बातमीदार) ः मालाड पश्चिमेतील मालवणीत गटारे तुंबून घाण पाणी रहिवाशांच्या दारापर्यंत येत आहे. मालवणीतील सानेगुरुजी वसाहत क्रमांक दोन येथील गटारे तुंबली आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. दुर्गंधीयुक्त पाण्यातून रहिवाशांना ये-जा करावी लागत आहे. पालिका पी उत्तर विभागाने येथील स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून जाणूनबुजून दुर्लक्ष होत असल्याचे स्थानिक रहिवासी तलत शेख यांनी सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.